पर्यटन मंत्रालय
देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्रालयाने तयार केले वैद्यकीय आणि निरामय पर्यटनाकरिता राष्ट्रीय धोरण आणि आराखडा
Posted On:
20 MAR 2023 7:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2023
देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने वैद्यकीय आणि निरामय पर्यटनासाठी राष्ट्रीय धोरण आणि आराखडा तयार केला आहे. या धोरणाचे प्रमुख आधारस्तंभ खालीलप्रमाणे आहेत:
i निरामयतेचे स्थान म्हणून भारतासाठी ब्रँड विकसित करणे
ii वैद्यकीय आणि निरामय पर्यटनासाठी परिसंस्था मजबूत करणे
iii ऑनलाइन मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल (MVT) पोर्टलची निर्मिती करून संगणकीकरण सक्षम करणे
iv वैद्यकीय मूल्याच्या प्रवासासाठी सुलभता वाढवणे
v. निरामय पर्यटनाला प्रोत्साहन देणे
vi प्रशासन आणि संस्थात्मक चौकट
30.11.2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार भारत सरकारने ई-टुरिस्ट व्हिसा योजनेचे उदारीकरण केले आणि ई-टूरिस्ट व्हिसा (ईटीव्ही) योजनेचे नाव बदलून ई-व्हिसा योजना असे करण्यात आले आणि सध्या त्यात ई-मेडिकल व्हिसा आणि ई-मेडिकल अटेंडंट व्हिसा अशा ई-व्हिसाच्या उप-श्रेणी आहेत.
ई-मेडिकल व्हिसाच्या बाबतीत आणि ई-मेडिकल अटेंडंट व्हिसासाठी, तिहेरी प्रवेशाची परवानगी आहे आणि परदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिकारी (एफआरआरओ)/परदेशी नोंदणी अधिकारी (एफआरओ) यांच्याकडून प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार केस-टू-केस आधारावर 6 महिन्यांपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते. मेडिकल अटेंडंट व्हिसा मुख्य ई-व्हिसा धारकाच्या वैधतेसह समान मर्यादेत होता.
तसेच, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, ते देशातील वैद्यकीय मूल्याच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी इतर मंत्रालये आणि हितधारकांशी समन्वय साधत आहे. क्षेत्रातील आव्हाने आणि संधींचा धांडोळा घेण्यासाठी संबंधित मंत्रालये, रुग्णालये, एमव्हीटी सुविधा प्रदाते, विमा कंपन्या आणि एनएबीएच इत्यादींसोबत हितधारकांच्या सल्लामसलतीच्या अनेक फेऱ्या आयोजित केल्या आहेत.
पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1908924)
Visitor Counter : 202