नागरी उड्डाण मंत्रालय

देशातल्या 148 कार्यरत विमानतळांच्या माध्यमातून 17 अनुसूचित विमान कंपन्या देशात कार्यरत


डीजीसीए (DGCA) ने 718 एअर ऑपरेटर सर्टिफिकेट अर्थात विमान चालन परवाने(AOC) वितरित केले

उडान(UDAN) योजने अंतर्गत निवडक एअरलाइन ऑपरेटर्सना( विमान चालन कंपन्यांना) व्हीजीएफ अर्थात व्यवहार्यता अंतर वित्त पोषण योजनेअंतर्गत व्हीजीएफ च्या रूपाने 2454 कोटी वितरित करण्यात आले

Posted On: 20 MAR 2023 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मार्च 2023

देशात 09.03.2023 या तारखेपर्यंत 17 अनुसूचित विमान कंपन्या कार्यरत आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) (Directorate General of Civil Aviation) एअर ऑपरेटर सर्टिफिकेट अर्थात विमान चालन परवान्यांवर (AOC)  मान्यता दिलेल्या विमानांची संख्या 718 आहे.

सध्या, देशात 148 कार्यरत विमानतळ आहेत, ज्यामध्ये 137 विमानतळ, 02 वॉटर एरोड्रोम आणि 09 हेलीपोर्टचा समावेश आहे. मार्च 2017 पर्यंत भारतीय विमानतळ प्राधिकरणाची 96 कार्यरत विमानतळे होती.

देशभरात उडान योजनेअंतर्गत विमाने चालवण्यासाठी व्हीजीएफ(VGF)अर्थात व्यवहार्यता अंतर वित्त पोषण योजनेअंतर्गत (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) दिनांक 07.03.2023 पर्यंत निवडक विमान चालन कंपन्यांना सुमारे 2454 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.व्यवहार्यता अंतर वित्त पोषण योजनेअंतर्गत विमान कंपन्यांना दिलेल्या  व्हीजीएफ चे राज्यवार विभाजन परिशिष्टानुसार खालील प्रमाणे आहे.

ANNEXURE

Amount of VGF disbursed to Airlines (State-wise) as on 07.03.2023

S. No.

Name of the State/UT

VGF Disbursed (in Rupees crore)

1

Nagaland

21.80

2

Sikkim

9.12

3

Uttarakhand

42.34

4

West Bengal

84.15

5

Odisha

150.53

6

Arunachal Pradesh

38.81

7

Andhra Pradesh

126.41

8

Karnataka

570.36

9

Uttar Pradesh

243.54

10

Madhya Pradesh

149.83

11

Tamil Nadu

23.14

12

Maharashtra

282.22

13

Chhattisgarh

63.76

14

Meghalaya

36.10

15

Diu

1.49

16

Gujarat

82.57

17

Assam

51.57

18

Kerala

105.09

19

Haryana

0.66

20

Punjab

86.42

21

Rajasthan

176.05

22

Himachal Pradesh

47.57

23

Jharkhand

1.29

24

Tripura

12.90

25

Mizoram

3.93

26

Manipur

12.57

27

Bihar

10.15

28

Delhi

18.52

29

Telangana

1.40

Total

2454.29

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

 

G.Chippalkatti/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908897) Visitor Counter : 122