सहकार मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातच्या जुनागढ मध्ये कृषी शिबिरात  जिल्हा बँक मुख्यालयांची कोनशिला बसवली आणि एपीएमसी किसान भवनाचं उद्घाटन केलं


केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातच्या जुनागढ मध्ये कृषी शिबीरात  जिल्हा बँक मुख्यालयांची कोनशिला बसवली आणि एपीएमसी किसान भवनाचे उद्घाटन केलं

Posted On: 19 MAR 2023 5:11PM by PIB Mumbai

 

सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला पुढे नेण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितलं. आता लाखो शेतकरी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून त्याचा लाभ घेत आहेत असं ते म्हणाले. नैसर्गिक शेती केल्याने उत्पादन वाढतं, पावसाच्या पाण्याचा संचय होतो, कीटकनाशकांच्या  वापराला आळा बसतो आणि उत्पादनातही वाढ झाल्याने बाजारात चांगला भाव मिळतो, असं ते म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0016LQS.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून तीन राष्ट्रीय स्तरावरील बहुराज्यीय सहकारी संस्थांची स्थापना केली आहे अशी माहिती अमित शाह यांनी दिली. या तीन संस्थांपैकी दोन संस्था गुजरातमधल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत असं त्यांनी सांगितलं. यापैकी एका संस्थेअंतर्गत  सेंद्रिय शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची उत्पादनं अमूलच्या पेटंट अंतर्गत स्विकारली जातील आणि त्याचा नफा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल असं ते  म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005O0OM.jpg

देशातल्या प्रत्येक पंचायतीत सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे असं शाह यांनी सांगितलं. सहकारी, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य उत्पादन संस्था यांची एकाच स्वरुपाची संस्था म्हणून नोंद होईल अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

***

S.Kane/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908601) Visitor Counter : 141