मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा देशातील मत्स्य क्षेत्रावर महत्वाचा प्रभाव पडणार आहे- सागर परिक्रमेच्या चौथा टप्पा दुसऱ्या आणि अंतिम दिनी मत्स्य व्यवसाय आणि पशुपालन मंत्री परुषोत्तम रूपाला यांचे प्रतिपादन
Posted On:
19 MAR 2023 6:47PM by PIB Mumbai
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभागाअंतर्गत मत्स्यविभाग आणि कर्नाटक, गोवा या राज्यांचे मत्स्यविभाग, तसेच भारतीय तटरक्षक दल, भारतीय मत्स्य सर्वेक्षण आणि मच्छिमार प्रतिनिधी अशा सर्वांच्या सहभागातून, गोव्यात मुरगाव बंदरावर सागर परिक्रमा या अभियानाचा चौथा टप्पा साजरा केला जात आहे. 17 मार्च 2023 पासून, या टप्प्याची सुरुवात झाली आहे. सागर परिक्रमेच्या या चौथ्या टप्प्यात माजली, कारवार, बेलंबरा, मानकी, मुरुडेश्वर, अल्वेकोडी, मालपे, उच्छिला, मंगळूर या 3 प्रमुख किनारी जिल्ह्यांतील एकूण 10 स्थानांचा समावेश होता आणि आज (19 मार्च 2023) मंगळूर टाऊनहॉल इथे त्याची सांगता झाली.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी यावेळी अधोरेखित केले की सागरी रुग्णवाहिका आपल्या मच्छीमारांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. त्यांनी या व्यवसायाशी संबंधित लोकांना या क्षेत्रात केसीसी चे फायदे मत्स्यपालन आणि संबंधित कामांसाठी वापरावेत, असे आवाहन केले. त्यांनी स्वयंसेवकांना पीएमएमएसवाय आणि केसीसी सारख्या योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली जेणेकरून लाभार्थींना त्याचा लाभ घेता येईल.

तसेच, पीएमएमएसवय योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या उपक्रमांचा देशातील मत्स्य क्षेत्रावर अतिशय महत्वाचा परिणाम होणार आहे, असेही रूपाला यावेळी म्हणाले. या योजनेचा उद्देश,मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा आहे, असे ते म्हणाले. याचे उद्दिष्ट मत्स्यव्यवसाय आणि सागरी उद्योगात आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतींचा अंगीकार करावा, असे ते म्हणाले.
यामुळे, मच्छिमार आणि मत्स्यशेती करणाऱ्यांचे उत्पन्न वाढेल तसेच बाजारपेठेत माशांची उत्पादकताही वाढेल, ज्याचा देशातील अन्नसुरक्षा आणि पोषक आहारावर देखील सकारात्मक परिणाम होईल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान, प्रगतीशील मच्छिमार, विशेषतः किनारपट्टीवरील मच्छीमार, मच्छीमार आणि मत्स्यपालन, तरुण मत्स्य उद्योजक इत्यादींना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, केसीसी आणि राज्य योजनेशी संबंधित प्रमाणपत्रे/मंजुऱ्या प्रदान करण्यात आल्या.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908560)
Visitor Counter : 183