कृषी मंत्रालय

भारताच्या अध्यक्षतेखाली झाली,  जागतिक पातळीवर भरड धान्याचे उत्पादन आणि खप वाढवण्यासाठी भरड धान्यांशी संबधित  अग्रगण्य देशांची मंत्रीगट स्तरीय  बैठक


गयाना, मॉरिशस, श्रीलंका, सुदान, सुरिनाम, झांबिया या देशांचे मंत्रीगण  आणि गाम्बिया, मालदीव व नायजेरिया या देशातील उच्चस्तरीय शिष्टमंडळ यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेतला सहभाग

केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांनी भरडधान्य उत्पादक देशांमधील वाढत्या सहभागाची केली विनंती

भारत हा भरडधान्याचा सर्वात मोठा उत्पादक देश आणि जगाच्या गरजा भागवणारा, भरडधान्याचा जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने करत आहे वाटचाल

सहभागी मंत्र्यांनी त्यांच्या देशातील भरडधान्य उत्पादनाच्या प्रसाराचे अनुभव सामायिक केले आणि जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी सहकार्याची दर्शवली तयारी

Posted On: 18 MAR 2023 10:15PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीत आज जागतिक भरड धान्य म्हणजेच श्रीअन्न परिषदेच्या उद्घाटनानंतरच्या सत्रात भरड धान्यांवर मंत्र्यांची गोलमेज परिषद झाली. गयाना, मॉरिशस, श्रीलंका, सुदान, सुरिनाम, झांबिया या देशांचे मंत्रीगण  आणि गाम्बिया व मालदीवचे कायमस्वरुपी कृषी सचिव, नायजेरियाचे मिलेट्स इनिशिएटीव विभागाचे महासंचालक यांनी या बैठकीत भाग घेतला. भारत सरकारच्या शेती आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांनी बैठकीत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचे स्वागत केले.

आंतराराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करण्यासाठीचा पहिलावहिला महा-कार्यक्रम असणाऱ्या जागतिक भरडधान्य (श्रीअन्न) परिषदेचे आज भारताने नवी दिल्ली येथे आयोजन केले आहे. भारताच्या पुढाकाराने 2023 हे वर्ष आंतराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचा यामागील उद्देश हा अन्न सुरक्षा तसेच पोषण या दृष्टीने भरड धान्याचे महत्व याबद्दल जागरुकता निर्माण करणे, तसेच त्याच्या उत्पादनाच्या संदर्भात संशोधन आणि विकास यात गुंतवणूक तसेच भरड धान्याचे उत्पादन, उत्पादकता आणि दर्जा याबद्द्ल संबधितांमध्ये उत्साह निर्माण करणे हा आहे. जागतिक स्तरावर अन्न आणि पोषण सुरक्षा याची हमी देण्याच्या दृष्टीने भरड धान्याच्या प्रसारात भरड धान्य उत्पादक देशांची भूमिका महत्वाची आहे.

कार्यक्रमाच्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शेती आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, तसेच पियुष गोयल व मनसुख मांडविय हे केंद्रीय मंत्री आणि कैलाश चौधरी या राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या जागतिक कार्यक्रमाचे  उद्घाटन केले. सहभागी देशांचे मान्यवर मंत्री यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी त्याच्या देशांचे संदेश सादर केले.  या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी IYM 2023चे विशेष नाणे आणि विशेष टपाल तिकिटाचे अनावरण केले.  भरडधान्यांवरील पुस्तकाचे त्यांनी डिजिटली प्रकाशन केले.   पंतप्रधान मोदींनी यावेळी  ICAR च्या भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेला जागतिक उत्कृष्टता केंद्र म्हणून घोषित केले.

मंत्रीगण गोलमेज परिषदेच्या आपल्या प्रारंभिक भाषणात नरेंद्रसिंग तोमर यांनी भरडधान्याचा सर्वोच्च उत्पादक आणि दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च  निर्यातदार असणाऱ्या भारताची श्रीअन्नच्या प्रसारातील भूमिका  विशद केली.  गेल्या 5 वर्षात भारताने भरडधान्यांचे  13.71 ते 18.02 दशलक्ष टन उत्पादन घेतले.

भरडधान्यांचा प्रसार आणि भरडधान्याची अतिरिक्त मागणी पुरवण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभाग 2018-19 पासून 14 राज्यांतील 212 जिल्ह्यांमध्ये  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पोषक-धान्य योजना राबवत आहे.  भारताने (एप्रिल ते नोव्हेंबर)  2022-23 या वर्षांमध्ये  1,04,146 मेट्रीक टन म्हणजे 365.85 कोटी रुपयांचे  धान्य निर्यात केले.  IYM नंतरही साजरी करण्याजोगी ही बाब आहे.

अन्न, संस्कृती आणि परंपरा याबाबतीत पुरातन प्रघातांचे मूल्य जाणण्याच्या बाबतीत भारत अग्रेसर आहे असे नमूद करुन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी म्हटले की भरड  धान्यांच्या बाबतीतही आपल्या संस्कृतीत ज्वारी, बाजरी, नाचणी, सवान, कांगणी, चीना, कोदो. कुटकी, आणि कुट्टू अशी मोठी विविधता आढळते. श्रीअन्न हा प्रथिने,तंतूमय आणि लोह, कॅल्शियम सारखी मूलद्रव्ये यांचा विपुल स्रोत आहे. त्याशिवाय त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. अनेकजण याला सुपरफूड मानतात.

भरडधान्यांचे एकच नाही तर अनेक फायदे आहेत.  स्थूलता निवारण, मधूमेह, उच्च रक्तदाब आणि  हृदयाशी संबधित आजार यांचे धोके त्यामुळे कमी होतात. मानवी आरोग्यात विशेषतः विकसनशील आणि उच्च लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये  कुपोषण हा भाग कळीचा असतो. कुपोषणाशी दोन हात करण्यात उर्जा आणि प्रथिनांनी मुबलक असलेली भरडधान्ये महत्वाची भूमिका बजावतात.

आज भारतात भरड धान्यांच्या प्रसारासाठी बरेच काही केले जाते. याशिवाय उत्पादनाच्या संशोधनाला शेतकरी संस्थांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यामुळे त्यांची उत्पादने, प्रक्रिया वाढवली पाहिजे. सरकारी मदतीने भरडधान्यांसाठी तयार केलेल्या स्टार्टअप्सच्या कामांवरही तोमर यांनी संतोष व्यक्त केला.  यापैकी काही भरड धान्यांपासूनची बिस्किटे,काही भरड धान्यांचे पॅनकेक्स आणि डोसे बनवतात. काही भरड धान्यांचे एनर्जी बार तयार करतात तर न्याहारीचे पदार्थ. तेव्हा कमी महत्वाची वाटणारी भरड धान्ये  ही  भविष्यातील जगात जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षा, शेतकऱ्यांची समृद्धी आणि धरणीमातेच्या  नवोन्मेष यासह  विशेष उत्तर आहे.

तोमर यांनी  या विस्मृतीत गेलेल्या सर्वोत्कृष्ट धान्य प्रकाराला ओळख निर्माण करुन देण्याचे आवाहन जागतिक नेत्यांना  केले.  शेतकरी , ग्राहक आणि हवामान यासाठी   IYM 2023 ही भरडधान्याची लोकचळवळ बनवण्याचे  लक्ष्य भारत सरकारचे आहे. जागतिक अन्न मंत्र्यांना याबाबतीत संवादी आणि आशावादी राहण्याचे आवाहन तोमर यांनी केले. भरडधान्य उत्पादक देशांनी एकमेकांशी सामायिक केलेले अनुभव त्यांना जवळ आणण्यासाठी उपयुक्त ठरतीत असे ते म्हणाले.

भरड धान्याच्या उत्पादनाचा विक्रेता आणि ब्रॅण्डिंगचा प्रसार करताना आलेले अनुभव भेटीला आलेल्या विविध देशांच्या मंत्र्यांनी सामायिक केले. जगभरात भरड धान्यांचे उत्पादन खत आणि मूल्यवर्धन तसेच प्रक्रिया या संदर्भात खूप काही करावे लागेल. सर्व नेत्यांनी भारताने भरड धान्यांना जागतिक अन्नाच्या थाळीत आणण्यासाठी बजावलेल्या प्रमुख भूमिकेची प्रशंसा केली आणि भारताकडून या संदर्भातील तंत्रज्ञान विषयक सहकार्य कडे अपेक्षेने बघत असल्याचे सांगितले. त्या सर्वांनी भरड धान्य उत्पादक देशांमध्ये जवळचे संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला. भारताने भरड धान्यांच्या सुधारित वाणांचे चांगले बियाणे पुरवावे कमी प्रमाणावरील शेतीसाठी सहकार्य आणि क्षमता वृद्धी यासाठी सहकार्य करावे अशी इच्छा सर्व देशांनी व्यक्त केली. सर्व देशांनी त्यांच्या देशांमध्ये लोकांना लागलेल्या गव्हाच्या सवयीमधून मुक्त करण्यासाठी स्वदेशी भरड धान्यांच्या प्रसाराला हातभार लावण्याची गरज व्यक्त केली.

भरड धान्यांचे उत्पादन हे प्राधान्यक्रमाचे पिक म्हणून जाहीर करण्याची आणि हा सर्व आंतरराष्ट्रीय बैठकात हे धोरण अवलंबण्याची सूचना सर्वांनी केली. गयानासारख्या काही देशाकडे त्यांची स्वतःची स्वदेशी भरड धान्य नाहीत त्यांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष यासारख्या उपक्रमातून निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे भरड धान्यांचे उत्पादन सुरू केले. या देशांना भारताने या संदर्भातील ज्ञान तंत्रज्ञान आणि क्षमता वृद्धी यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि  भारतीय शेती संशोधन कौन्सिल या संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीत भाग घेतला.

संयुक्त सचिवांनी भरड धान्य उत्पादक देशातील सर्व मंत्रांचे आणि इतर मान्यवरांचे  आभार मानले.

***

G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1908470) Visitor Counter : 511


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu