नागरी उड्डाण मंत्रालय

डिजी यात्रा अंतर्गत, प्रवाशांची माहिती (डेटा) त्यांच्या साधनामध्ये संग्रहित होते, मध्यवर्ती ‘स्‍टोअरेज’ मध्‍ये साठवली जात नाही


डिजी यात्रा हा ‘बायोमेट्रिक बोर्डिंग’ प्रणालीसाठी चेहरा ओळखण्‍याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा एक उपक्रम

Posted On: 16 MAR 2023 2:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2023

 

डिजी यात्रा अंतर्गत, प्रवाशांची माहिती ( डेटा)  त्यांच्या स्वत:च्या इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये संग्रहित होते. मध्‍यवर्ती  स्टोरेजमध्ये नाही.  सर्व प्रवाशांची माहिती,  त्यांच्या स्मार्टफोनच्या वॉलेटमध्ये ‘एनक्रिप्टेड’  आणि संग्रहित केली  जाते. ही माहिती  फक्त प्रवासी आणि  तो प्रवासी जिथून प्रवास सुरू करतो, त्‍या विमानतळाला  सामायिक केली  जाते.  कारण  प्रवाशाचे  डिजी यात्रा ओळखपत्र प्रमाणित करण्यासाठी  त्या माहितीची आवश्यकता असते. विमान प्रवास सुरू झाल्यानंतर  24 तासांच्या आत विमानतळाच्या सिस्टममधून ती माहिती काढून टाकली  जाते.  प्रवासी ज्यावेळी  प्रवास करतात त्याचवेळी आणि जिथून प्रवास सुरू होतो, त्याच विमानतळावर माहिती  थेट सामाईक  केली जाते.

ही माहिती  ‘एनक्रिप्टेड’ असते, म्हणजे कूटबद्ध  असल्यामुळे तो इतर कोणाला/  घटकाद्वारे वापरता येत नाही. तसेच  ही प्रक्रिया ऐच्छिक आहे. यामुळे प्रवास  सुरळीत, त्रासमुक्त होतो. शिवाय थेट  स्‍पर्श टाळणे शक्य असते, त्यामुळे आरोग्याविषयी जोखीममुक्त प्रवासाची सोय होते. 

एका ट्विटर वापरकर्त्याने 15 मार्च 2023 रोजी, विचारलेल्या प्रश्‍नाला  उत्तर देताना, नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट केले, “प्रवाशांच्या वैयक्तिक माहितीचा डेटा कोणत्याही केंद्रीय भांडारात किंवा डिजी यात्रा फाउंडेशनद्वारे संग्रहित केला जात नाही. डिजी यात्रा या  सुरक्षित वॉलेटमध्ये प्रवाशांच्या स्वतःच्या मोबाईल फोनमध्ये हा  डेटा संग्रहित केला जातो.  कोणताही डेटा संकलित किंवा संग्रहित केला जात नाही, याची खात्री बाळगा. ”

डिजी यात्रा हा बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टमसाठी ‘फेशियल रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचा नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. प्रवाशांना विमानतळावर अखंड आणि त्रासमुक्त अनुभव प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. अनेक ‘टच पॉइंट्स’ वर तिकीट आणि ओळख पडताळणीची गरज दूर करून आणि डिजिटल फ्रेमवर्क वापरून विद्यमान पायाभूत सुविधांद्वारे उत्तम सेवा प्राप्त करून प्रवाशांना  चांगला अनुभव देणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

 

* * *

JPS/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907517) Visitor Counter : 151