ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय अन्न महामंडळाकडून गव्हाच्या विक्रीसाठी 6 वा ई-लिलाव संपन्न
23 विभागातील 611 गोदामातून 10.69 लाख मेट्रिक टन गव्हाची उपलब्धता
6 व्या ई- लिलावाव्दारे 970 बोलीदारांना 4.91 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री
Posted On:
16 MAR 2023 12:24PM by PIB Mumbai
देशामध्ये गहू आणि गव्हाच्या पिठाच्या (आटा) किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून उपाय योजना म्हणून, गव्हाच्या साप्ताहिक ई-लिलावाचा 6वा भाग, भारतीय अन्न महामंडळाव्दारे 15.03.2023 रोजी आयोजित केला होता. भारतीय अन्न महामंडळाच्या 23 विभागातील 611 गोदामामधून एकूण 10.69 लाख मेट्रिक टन गहू लिलावासाठी उपलब्ध करण्यात आला. महामंडळाने 970 बोलीदारांना त्यापैकी सुमारे 4.91 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री केली.
6 व्या ई-लिलावात, अखिल भारतीय भारित सरासरी राखीव किंमत 2140.46 रुपये प्रति क्विंटलच्या तुलनेत सरासरी विक्री किंमत 2214.32रुपये प्रति क्विंटल इतकी मिळाली.
6 व्या ई लिलावामध्ये 100 ते 499 मेट्रिक टनपर्यंत जास्तीत जास्त मागणी होती, त्यानंतर 500-999 मेट्रिक टन आणि त्याखालोखाल 50-100 मेट्रिक टन गव्हाला मागणी होती.
6 व्या ई-लिलावानंतर, देशांतर्गत खुल्या बाजारात विक्री योजने अंतर्गत गव्हाची एकत्रित विक्री 45 लाख मेट्रिक टनाच्या एकूण वाटपाच्या तुलनेत 33. 77 लाख मेट्रिक टनावर पोहोचली आहे. सरकारने केलेल्या या उपाय योजनेमुळे संपूर्ण देशात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या (आट्याच्या) किमती कमी करण्यासाठी योग्य तो परिणाम झाला आहे. आता हे दर खुल्या बाजारात विक्री (देशांतर्गत) योजनेअंतर्गत गव्हाच्या खुल्या विक्रीसाठी भविष्यातील निविदांसह स्थिर राहण्याची शक्यता आहे.
***
JaiudeviPS/SuvarnaB/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1907504)
Visitor Counter : 234