भारतीय स्पर्धा आयोग

कमिन्सद्वारे, मेरिटरचे संपूर्ण नियंत्रण संपादन करण्यास सीसीआयची मंजूरी

Posted On: 15 MAR 2023 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2023 

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) कमिन्सद्वारे, मेरिटरचे संपूर्ण नियंत्रण संपादन करण्यास मंजूरी दिली आहे. या संयोजनामध्ये कमिन्स इंक द्वारे मेरिटर, इंक.चे एकमेव अर्थात संपूर्ण नियंत्रण संपादन करणे समाविष्ट होते.

कमिन्स ही अमेरिकेतील कंपनी असून डिझेल, नैसर्गिक वायू, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड पॉवरट्रेन तसेच पॉवरट्रेन-संबंधित घटकांचे डिझाइन, उत्पादन, वितरण, सेवा यामध्ये सक्रीय आहे.

मेरिटर ही अमेरिकेतील कंपनी असून, व्यावसायिक वाहन, वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी एक्सेल, ब्रेक तसेच इतर घटकांचा ती पुरवठादार असल्याचे म्हटले जाते.

सीसीआयचा तपशीलवार आदेश लवकरच जारी केला जाईल. 

 

* * *

S.Bedekar/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1907249) Visitor Counter : 87


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu