भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगाने रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडद्वारे मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संपादनाला दिली मान्यता
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2023 11:59AM by PIB Mumbai
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडद्वारे मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संपादनास मान्यता दिली आहे.
या प्रस्तावित संयोजनामध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (अॅक्वायरर) द्वारे मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या (लक्ष्यित) जारी केलेल्या आणि पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 100% संपादनाचा समावेश आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आहे. ही अधिग्रहणकर्ता कंपनी, तिच्या उपकंपन्या आणि संलग्न संस्थांद्वारे, भारतातील खाद्यपदार्थ आणि किराणामाल, टिकाऊ वस्तू, पोशाख आणि पादत्राणे यासारख्या श्रेणींमधील उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ विक्री करते.
मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशात घाऊक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाचा तपशीलवार आदेश लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.
***
Samarjeet T /Sampada/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1907094)
आगंतुक पटल : 270