आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

योग महोत्सव-2023 च्या दुसऱ्या दिवशी योग प्रचाराशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन

Posted On: 14 MAR 2023 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2023

नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम मध्ये सुरु असलेल्या योग महोत्सव-2023 च्या दुसऱ्या दिवशी योग प्रात्यक्षिके, सामंजस्य करारावर स्वाक्षरी, प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रवचन, प्रश्नमंजुषा, स्पर्धा, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्यक्रम आणि योग सादरीकरणे झाली.

आंतरराष्ट्रीय योग दिवस - 2023 च्या 100 दिवस आधी म्हणजे काल  आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल  यांच्या हस्ते करण्यात आले.

मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कंठावर्धक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी योगाचे महत्त्व आणि मानवजातीसाठी योग कसा उपयुक्त ठरत  आहे यावर तज्ञांनी मोठ्या प्रमाणावर चर्चा केली. विविध कार्यक्रमांद्वारे योगाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या संस्था कशा अथकपणे काम करत आहेत याविषयीही  तज्ञांनी  माहिती दिली. याशिवाय, योग- योगाचा इतिहास/वर्तमान/भविष्य या विषयावर अग्रगण्य योग संस्थांच्या प्रमुखांनी एक प्रेरणादायी अनुभव सामायिक करणाऱ्या चर्चेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.

पतंजली योग पीठ आणि पिरॅमिड योग संघातील मुलांनी योगावर आधारित काही चित्त थरारक सादरीकरण केले,ज्यांना प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली.

याशिवाय प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, पोस्टर सादरीकरण अशा स्पर्धाही झाल्या. उद्या (15 मार्च 2023) मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या आवारात नवी दिल्ली येथे महोत्सवोत्तर योग कार्यशाळा आयोजित केली जाईल.

 

  

 

 

 

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1906904)