आयुष मंत्रालय
योग महोत्सव 2023 ने नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 100 दिवसांच्या उलट गणनेला सुरूवात
प्रविष्टि तिथि:
13 MAR 2023 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मार्च 2023
आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 च्या 100 दिवसांच्या उलटगणनेची सुरुवात म्हणून योग महोत्सव 2023 या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन आज नवी दिल्ली येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात सोनोवाल यांनी योगाचा प्रसार आणि त्याच्या व्यापक स्वीकृतीने भारत जागतिक आरोग्य आणि निरामयतेचे नेतृत्व करत आहे याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. सर्बानंद सोनोवाल यांनी "Y" ब्रेक योगा वर एक मिनिटाचा व्हिडिओ देखील प्रकाशित केला, जेणेकरून बहुतांश लोकांना विशेषत: सातत्याने काम करणाऱ्यांना जीवनशैलीत योगाचा समावेश करता येईल.

योग महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ.मुंजपारा महेंद्रभाई,आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या प्रसंगी सर्बानंद सोनोवाल यांनी सर्व कंपन्यांना त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात एक "योगसाधना कक्ष " सुरू करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी उत्साह आणि कार्यक्षमता वाढविण्यात मदत होईल.
S.Kane/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1906519)
आगंतुक पटल : 270