रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे 10,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या 18 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

Posted On: 13 MAR 2023 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2023

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी आणि इतर खासदार, आमदार व अधिकारी यांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेश मधील गोरखपूर येथे 10,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीच्या 18 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली.  


 

 

सोनौली-गोरखपूरच्या चौपदरीकरणामुळे आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा मजबूत होईल, असे यावेळी गडकरी म्हणाले. बायपासच्या बांधकामामुळे, गोरखपूर रिंगरोड पूर्ण होईल आणि शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची मुक्तता होईल आणि व्यावसायिक, निवासी दालनांची स्थापना करण्यास मदत होईल.

कुशीनगर ते लुंबिनी या रस्त्याच्या बांधकामामुळे बौद्ध पर्यटन स्थळांच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळेल, असे ते म्हणाले. गिलोला बायपासच्या बांधकामामुळे बहराइच-श्रावस्ती-बलरामपूरची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. यासोबतच देवी पाटण मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वाहतूक सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले की, बाबा गोरक्षनाथजींच्या या पावन भूमीवर या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होत असल्याने उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन मिळेल आणि औद्योगिक विकासाला ही चालना मिळेल.

 

S.Kane/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1906469) Visitor Counter : 172