अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2022-23 साठी 10 मार्च 2023 पर्यंतचे प्रत्यक्ष कर संकलन


आर्थिक वर्ष 2022-23 साठी सकल प्रत्यक्ष कर संकलन 16.68 लाख कोटी रुपये; गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण संकलनाच्या तुलनेत 22.58% अधिक

निव्वळ कर संकलन 13.73 लाख कोटी रुपये; गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 16.78% अधिक

2.95 लाख कोटी रुपये परतावा जारी; गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 59.44% अधिक

Posted On: 11 MAR 2023 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2023

 

प्रत्यक्ष  कर संकलनाची  10 मार्च 2023 पर्यंतची  तात्पुरती आकडेवारी स्थिर वृद्धी  नोंदवत आहे. 10 मार्च 2023 पर्यंत 16.68 लाख कोटी रुपये  प्रत्यक्ष कर संकलन झाले असून जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील सकल कर संकलनापेक्षा 22.58% अधिक आहे. परतावा वजा करता प्रत्यक्ष कर संकलन, 13.73 लाख कोटी रुपये आहे जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ कर संकलनापेक्षा 16.78% अधिक आहे. हे संकलन एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 96.67% आणि आर्थिक वर्ष 2022-23 च्या प्रत्यक्ष करांच्या एकूण सुधारित अंदाजांच्या 83.19% आहे.

एकूण महसूल संकलनाच्या दृष्टीने, कॉर्पोरेट प्राप्तिकर (सीआयटी) आणि वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) यामधील वाढीचा दर लक्षात घेता, सीआयटीसाठी वाढीचा दर 18.08% आहे तर पीआयटीसाठी (एसटीटी  सह) 27.57% आहे. परताव्याच्या समायोजनानंतर, कॉर्पोरेट प्राप्तिकर संकलनामधील  निव्वळ वाढ 13.62% आहे आणि वैयक्तिक प्राप्तिकर संकलनामधील 20.73% (केवळ पीआयटी) / 20.06% (एसटीटी सह पीआयटी) इतकी आहे.

1 एप्रिल 2022 ते 10 मार्च 2023 या कालावधीत. 2.95 लाख कोटी रुपये परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत 59.44% अधिक आहे.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1905873) Visitor Counter : 278