राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या भावी पिढीच्या कल्याणासाठी गरोदरपणातील मधुमेह रोखणे महत्त्वाचे : डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
10 MAR 2023 5:49PM by PIB Mumbai
भारताच्या भावी पिढीच्या कल्याणासाठी गरोदरपणातील मधुमेह रोखणे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय मंत्री आणि देशातले प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
गरोदरपणातील मधुमेह या भारतातल्या अभ्यास गटाच्या (डीप्सी )वार्षिक परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की टाइप-2 मधुमेह मेलिटसने भारतात महामारीचे रूप धारण केले गेले असून भारत जगातले मधुमेहाचे आगर ठरू लागला आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत, जोपर्यंत आपण गर्भवती महिलांमध्ये मधुमेह प्रभावीपणे रोखू शकत नाही, तोपर्यंत टाईप-2 डायबेटिस मेलिटसची एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी साखळी खंडित करणे शक्य होणार नाही आणि त्यामुळे भावी पिढ्यांवरील त्याचा दुष्परिणाम थोपवता येणार नाही.
डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, हे सर्वज्ञात सत्य आहे की ज्या महिलेला गर्भधारणा मधुमेह मेलिटस (GDM) होतो तिच्या संततीला टाइप-2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते आणि तेही तुलनेने कमी वयात होण्याची शक्यता असते.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आजचे नवजात उद्याचे तरुण आहेत आणि ते 2047 मध्ये भारताचा चेहरा आणि प्रतिमा ठरवतील.म्हणूनच आपण गरोदरपणातील मधुमेहाच्या प्राथमिक प्रतिबंधासाठी डॉ. व्ही. सेशिया यांनी पुकारलेल्या लढ्याला पाठींबा द्यायला हवा.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905774)