आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत केले उदघाटन


लोकांना कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून देणारा भारत हे जगासाठी एक उदाहरण आहे: जगदीप धनखड

दर्जेदार आणि परवडणारी औषधे पुरवून जगाला उपचार पुरवण्यात भारत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे: डॉ. मनसुख मांडविया

Posted On: 10 MAR 2023 5:03PM by PIB Mumbai

 

लोकांना कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून देणारा भारत हे जगासाठी एक उदाहरण असून तंत्रज्ञानामुळे सुलभता येते आणि नागरिकांचा आर्थिक भार हलका होतो, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे.आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकन 2023 या आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते आज बोलत होते. आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकन या विषयावरील ही दुसरी परिषद असून यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया उपस्थित होतेनीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. व्ही के पॉल हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटना आणि सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील आरोग्य संशोधन विभागाने या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. 'सार्वत्रिक आरोग्य सेवेसाठी आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनाद्वारे (एचटीए) प्राप्त पुराव्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा तंत्रज्ञानाची किफायतशीरता, उपलब्धता आणि सुलभता' ही या परिसंवादाची संकल्पना होती. यामुळे आरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनाचे महत्त्व, आरोग्य तंत्रज्ञानाच्या वापरावरील आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या विषयावर विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी अध्यापक, संशोधक, धोरण निर्माते, उद्योजक इत्यादी भागधारकांसाठी मंच उपलब्ध झाला. तसेच देशात प्रथमच एचटीए मार्केटप्लेसचे आयोजन करण्यात येऊन ज्ञान/उत्पादन सामायिक करण्यासाठी मंच उपलब्ध झाला. या परिसंवादात सुमारे 250 जण सहभागी झाले होते.

Image

Image

Image

अंत्योदयाच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून देशाच्या शेवटच्या मैलापर्यंत आणि दुर्गम भागात सेवा पोहोचविण्याबाबत पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार उपराष्ट्रपतींनी यावेळी केला.  ''9,100 हून अधिक जनऔषधी केंद्रांद्वारे किफायत दरात औषधे, वैद्यकीय कार्यदल, संस्था इत्यादी बळकट करणे, स्वच्छ भारत अभियानाद्वारे वर्तनात्मक बदल, आत्मनिर्भरता उपक्रमासारखी क्रांतिकारी पावले, याद्वारे भारत किफायतशीरता, सुलभता आणि समानता सुनिश्चित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेगरीब आणि वंचित वर्गावरील भार हलका करण्यासाठी सरकारने अनेक उपक्रमही हाती घेतले आहेत.''

आरोग्य तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि त्याच्या मूल्यांकन प्रक्रियेचे महत्त्व उपराष्ट्रपतींनी सांगितलेसमानता सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्वपूर्ण स्वरूप त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, "गुणवत्तापूर्ण प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञान हा एक कलाटणी देणारा भाग आहे.''

आजच्या परिसंवादासाठी उपस्थितांचे डॉ. मनसुख मांडविया यांनी आभार मानले.  "लोक कल्याणासाठी घेतलेल्या सार्वजनिक उपक्रमांचे मूल्यमापन ही काळाची गरज आहे," असे त्यांनी सांगितले. अधिक कार्यक्षम प्रक्रिया स्थापित करण्यास आणि कार्यक्रम उपक्रमांच्या अधिक चांगल्या परिणामकारकतेसाठी प्रतिसाद यंत्रणा म्हणून काम करेल.   देशाच्या सार्वत्रिक आरोग्य छत्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या सर्व नागरिकांना आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिलीआरोग्य तंत्रज्ञान मूल्यांकनाच्या मदतीने संसाधनांचा चांगल्या प्रकारे वापर केला जाऊ शकतोआरोग्य क्षेत्रात संसाधनांची तरतूद आणि उपयोग करण्यासाठी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही पद्धत आहे.

''पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आमचे उद्दिष्ट स्पर्धेद्वारे नव्हे तर समन्वय आणि सहयोगाद्वारे विकसित देश होण्याचे आहे,'' असे मांडविया यांनी नमूद केले. आरोग्य क्षेत्रातही भागधारकांमध्ये असेच सहकार्य आवश्यक आहे, असेही म्हणाले.

देशवासीयांच्या कल्याणासाठी अनेक मोठी पावले उचलण्यात आली असल्याचे, डॉ. विनोद कुमार पॉल यांनी या सत्राचा प्रारंभ करताना सांगितलेत्यांनी टेलिमेडिसीन क्षेत्रामधील सर्वोत्तम पद्धती वापरण्यावर भर दिला, पुरवठ्यातील अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले.   जागतिक आरोग्य समुदायासोबत सहकार्य मजबूत करण्याचे आणि देशाच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी विविध क्षेत्रातील भागधारकांना  केले.

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905629) Visitor Counter : 179


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu