भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाच्यावतीने तिस-या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Posted On:
08 MAR 2023 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2023
भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने (ईसीआय) 09 मार्च 2023 रोजी समावेशक निवडणुकांशी निगडीत संकल्पनेवर तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद आभासी पद्धतीने होणार आहे. याआधी डिसेंबर, 2021 मध्ये ‘समिट फॉर डेमोक्रसी' या संकल्पनेवर आभासी पद्धतीने आयोजन परिषदेचे करण्यात आले होते, त्याच परिषदेचा पुढचा अध्याय आता होणार आहे.
या परिषदेमध्ये 25 देश/ ईएमबीमधील 46 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अंगोला, आर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चिली कोस्टा रिका, क्रोएशिया, डेन्मार्क, डॉमिनिका, जॉर्जिया, गयाना, केनिया, कोरिया प्रजासत्ताक, मॉरिशस, मोल्दोव्हा, नॉर्वे, फिलीपिन्स, पोर्तुगाल, रोमानिया या देशातले प्रतिनिधी सहभागी होतील. तसेच सेंट लुसिया, सुरीनाम, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि झांबिया तसेच आंतरराष्ट्रीय आयडीईए आणि ‘इंटरनॅशनल फाऊंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम’ मधील आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी आणि सहभागी होणार आहेत. इंडोनेशियातील दिव्यांगांना प्रवेशासाठी सामान्य निवडणूक नेटवर्क आणि नेपाळमधील युवा संघटना यासारख्या नागरी संस्था संघटनांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांची या परिषदेमध्ये मार्गदर्शनपर भाषणे होणार आहेत.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905172)
Visitor Counter : 188