श्रम आणि रोजगार मंत्रालय

सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी देशभरात 9,000 हून अधिक जन औषधी केंद्रे उघडण्यात आल्याची केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती

Posted On: 07 MAR 2023 3:43PM by PIB Mumbai

केंद्रीय श्रम आणि रोजगार ,पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज द्वारका, दिल्ली येथे आयोजित केलेल्या जनऔषधी दिन 2023 या  कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी यादव  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व लोकांपर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने देशभरात 9,000 हून अधिक जन औषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत.

या केंद्रांवर कमी किमतीत औषधे उपलब्ध असल्याने महागड्या औषधांच्या किंमतींपासून जनतेला दिलासा मिळत आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितले. यासोबतच महिलांची सोय लक्षात घेऊन या जनऔषधी केंद्रांवर सरकारकडून स्वस्त दरात सॅनिटरी पॅडची उपलब्धता सुनिश्चित करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

<

यादव म्हणाले की या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून सरकार  कार्य करत आहे.

***

Nilima C/Sampada/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904969) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu