रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नागालँडमध्ये दिमापूर ते कोहिमा (पॅकेज-II) या 14.71 किलोमीटर लांबीच्या 339.55 कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी महामार्गाचे बांधकाम हाती घेतले जात असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

Posted On: 06 MAR 2023 2:45PM by PIB Mumbai

नागालँडमध्ये दिमापूर ते कोहिमा (पॅकेज-II) या 14.71 किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गाचे बांधकाम सुरू केलं जाणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास प्रकल्प असून त्यासाठी एकूण 339.55 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट मालिकेत दिली आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश राजधानी कोहिमा आणि नागालॅंडमधील इतर प्रमुख व्यावसायिक केंद्रांमधील दळणवळण सुधारणे हा आहे. त्यामुळे या भागाचा विकास आणि भरभराटीसाठी लोक आणि वस्तूंची जलद वाहतूक शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. या पायाभूत सुविधा किफायतशीर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असतील.  या पायाभूत सुविधा काटेकोर नियोजन आणि कोणत्याही तडजोडीशिवाय गुणवत्तेच्या मानकांचे पालन करणाऱ्या आहेत,असे त्यांनी पुढे नमूद केले.

****

Nilima C/Prajna/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904593) Visitor Counter : 95