आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

गुवाहाटी येथे ‘शांघाय सहकार्य संघटनेची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आणि पारंपरिक औषध प्रदर्शनात' 590 कोटी रुपयांहून अधिक व्यापारविषयक स्वारस्यासह आयुष बाजारपेठेला मोठी चालना

Posted On: 05 MAR 2023 9:58PM by PIB Mumbai

 

शांघाय सहकार्य संघटनेची पहिली B2B परिषद आणि पारंपरिक औषध प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली. यामुळे विविध देशांमधील खरेदीदार आणि विक्रेत्यांना लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापार क्षमतांचा शोध घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.  या परिषदेत खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या दोन दिवसांच्या  बैठकीमध्ये 590 कोटी रुपयांहून अधिक व्यापारविषयक स्वारस्य दर्शवण्यात आले.  शांघाय सहकार्य संघटनेच्या  उपक्रमांतर्गत अशा प्रकारची पहिली परिषद आणि प्रदर्शनाचे  उद्घाटन 2 मार्च 2023 रोजी आसाममधील गुवाहाटी  येथे केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. आज समारोप झालेल्या या दोन दिवसीय परिषद आणि चार दिवसीय प्रदर्शनात 17 देशांमधून  150 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखाली, इन्व्हेस्ट इंडियाने Ayushexcil (आयुष्य निर्यात प्रोत्साहन परिषद ) च्या सहाय्याने समर्पित B2B लाउंजमध्ये B2B बैठका घेतल्या. प्रदर्शनात सहभागी 56 हून अधिक प्रदर्शक आणि 19 देशांमधील खरेदीदारांनी पारंपरिक औषधांबाबत  चर्चा केली तसेच या  औषधांच्या व्यापारात  स्वारस्य दाखवले. परिषदेच्या पहिल्या दिवशी खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात 50 हून अधिक  बैठका झाल्या. पारंपारिक औषधी उत्पादनांच्या क्षेत्रात आयुर्वेदिक औषधे, हर्बल न्यूट्रास्युटिकल्स, आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने यांसारख्या  उत्पादनांच्या श्रेणींमध्ये सर्वाधिक स्वारस्य दिसून आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या  दिवशी 75 हून अधिक बैठका झाल्या, ज्यामध्ये भारत, ताजिकिस्तान, आर्मेनिया, उझबेकिस्तान, मंगोलिया, कझाकस्तान, बहरीन आणि श्रीलंका मधील प्रतिनिधी सहभागी झाले. B2B बैठकीत कंपन्यांकडून 590 कोटीहून अधिक  व्यापारविषयक स्वारस्य दर्शवण्यात आले. आयुर्वेदिक जेल आणि तेल, कॅप्सूल, केसांसाठी  आयुर्वेदिक  उत्पादने, न्यूट्रास्युटिकल्स, आयुर्वेदिक होम केअर आणि स्वच्छता आणि पशुवैद्यकीय उत्पादने यासारख्या उत्पादनांच्या श्रेणींना मोठा प्रतिसाद मिळाला. उद्योगाला तब्बल 9 इरादा पत्रे प्राप्त झाली.

B2B परिषदेत फार्माकोपिया, गुणवत्ता हमी आणि संशोधन यासह 'पारंपारिक औषधांसाठी नियामक व्यवस्था ' उत्पादने आणि पद्धतींवर एससीओ आणि भागीदार देशांकडून विस्तृत सादरीकरण आणि चर्चा झाली. पारंपारिक औषधांचा कशा प्रकारे प्रसार करता येईल यावर देखील चर्चा झाली. 'तुमच्या खरेदीदाराला जाणून घ्या' आणि 'B2B बैठका' यांसारख्या सत्रांमुळे विशिष्ट उत्पादन-निहाय, निर्यात आणि आयात संधी आणि मजबूत आर्थिक भागीदारींवर चर्चा करण्यासाठी एससीओ देशांमधील बाजारपेठेत प्रवेशासाठी उत्साह वाढवण्यात मदत झाली. शांघाय सहकार्य संघटना  आणि भागीदार देशांमध्‍ये पारंपारिक औषध प्रणाली संबंधी  व्‍यापार संधीचा लाभ घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. आयुष आणि परदेशी पारंपारिक औषध उद्योग/निर्यातदार/आयातदारांनी त्यांची उत्पादने आणि सेवा या प्रदर्शनात मांडल्या होत्या.

आयुष मंत्रालय शांघाय सहकार्य संघटना  आदेशांतर्गत विविध उपक्रमांवर काम करत आहे. या वर्षी फेब्रुवारी मध्ये पारंपारिक औषध प्रणालीतील तज्ञ आणि अभ्यासकांची आभासी परिषद आयोजित करण्यात आली होती , ज्यामध्ये एससीओच्या 25 देशांमधील  तज्ञ सहभागी झाले होते.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1904458) Visitor Counter : 129