रसायन आणि खते मंत्रालय
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेबद्दल मुलांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी पाचव्या जनऔषधी दिन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 34 ठिकाणी बाल मित्र दिवस साजरा
MyGov व्यासपीठावर बालमित्रांसाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेबाबत ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
Posted On:
04 MAR 2023 10:49PM by PIB Mumbai
सध्या सुरू असलेल्या जनऔषधी दिवस 2023 आयोजनाचा आजचा चौथा दिवस ‘बाल मित्र दिवसाच्या रुपात साजरा करण्यात आला. 5व्या जनऔषधी दिनानिमित्त, फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) देशभरात आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) चा चौथ्या दिवसाचा कार्यक्रम मुलांना समर्पित करण्यात आला.
यावेळी मुलांसाठी ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली आणि 50 विजेत्यांना प्रत्येकी 500/- रुपये रोख बक्षीस देण्यात आले. प्रश्नमंजुषाद्वारे मुलांना जनऔषधी योजना आणि त्याचे फायदे यांची माहिती करून देण्यात आली.
आजच्या दिवशी, शाळेच्या आवारात आकर्षक उपक्रमांद्वारे जनऔषधीचा संदेश देण्यासाठी शाळकरी मुले मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाली होती. भारतीय जनऔषधी योजनेबाबत माहितीचा प्रसार करण्यासाठी फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया या संस्थेने आकाश कंदील आणि फुगे सोडण्याचे तसेच मुलांसाठी मुखवटे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत, फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया (पीएमबीआय) ही या योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि मुलांसह सामान्य लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी 4 मार्च 2023 रोजी असे विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. या योजनेचा लाभ देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
औषधनिर्माण विभागाने 1 मार्च 2023 ते 7 मार्च 2023 या कालावधीत विविध शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमात जन औषधी योजनेबाबत जनजागृतीवर भर दिला जाईल. सेमिनार, मुले, महिला आणि सेवाभावी संस्थांसाठी कार्यक्रम, हेरिटेज वॉक, आरोग्य शिबिरे आणि असे इतर अनेक उपक्रम देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांचे मालक, लाभार्थी, राज्य/ केंद्रशासित प्रदेश अधिकारी, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, फार्मासिस्ट आणि जन औषधी मित्र यांचा समावेश आहे.
ही योजना देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत स्वस्त दरात औषधाची सहज पोहोचतील हे सुनिश्चित करते. सरकारने डिसेंबर 2023 अखेरपर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची (PMBJKs) संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेच्या उत्पादन यादीत 1759 औषधे आणि 280 शस्त्रक्रिया उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय, नवीन औषधे आणि न्यूट्रास्युटिकल्स उत्पादने जसे की प्रोटीन पावडर, माल्ट-आधारित अन्न पूरके, प्रोटीन बार, इम्युनिटी बार, सॅनिटायझर, मास्क, ग्लुकोमीटर, ऑक्सिमीटर यासारखी उत्पादने देखील या केंद्रात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजने अंतर्गत उपलब्ध औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतींपेक्षा 50% ते 90% कमी आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत 893.56 कोटी (MRP वर). रुपयांच्या औषधांची विक्री झाली. आर्थिक वर्षात (2022-23), प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेअंतर्गत 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त औषधांची विक्री झाली. ज्यामुळे नागरिकांच्या अंदाजे 6600 कोटी रुपयांची ची बचत झाली आहे.
***
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904274)
Visitor Counter : 186