राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते भोपाळ इथे 7 व्या आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषदेचे उद्घाटन
Posted On:
03 MAR 2023 2:12PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 मार्च 2023) भोपाळ येथे सातव्या आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषदेचे उद्घाटन केले. ''सांची बौद्ध -भारतीय ज्ञान अध्ययन विद्यापीठाच्या'' सहकार्याने इंडिया फाउंडेशनने या परिषदेतचे आयोजन केले होते.
भारतीय अध्यात्मातील महान वटवृक्षाची मुळे भारतात असून त्याच्या असंख्य शाखा आणि वेली जगभर पसरलेल्या आहेत, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
धर्म-धम्म ही संकल्पना भारतीय चेतनेचा मूळ आवाज आहे. आपल्या परंपरेत असे म्हटले आहे, “धर्यते अनेन इति धर्मः” – जे धारण करु तोच धर्म होय. त्याचबरोबर आपल्याला रूचते, तसेच वर्तन आपण इतरांबरोबर करणे म्हणजे धर्म होय. अशा धर्माच्या पायावरच संपूर्ण मानवता टिकून आहे. “वसुधैव कुटुंबकम”, म्हणजेच संपूर्ण जग एक कुटुंब आहे, अशी घोषणा भारत जागतिक मंचावर करतो, त्यावेळी तो पूर्वेकडील मानवतावादासाठी आपली वचनबद्धता घोषित करतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
मानवाच्या दुःखाचे कारण जाणणे आणि त्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणे, हे पौर्वात्य मानवतावादाचे वैशिष्ट्य आहे. ते आजच्या युगात अधिक महत्त्वाचे झाले आहे. आपल्या धर्म-धम्माच्या परंपरेत सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना आपल्या जीवनाचा एक भाग आहे. हे पौर्वात्य मानवतावादाचे सार आहे.
राष्ट्रपतींचे, संपूर्ण भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
***
S.Bedekar/V.Ghode/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903904)
Visitor Counter : 205