युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि नेमबाज अनिश भानवाला यांच्या प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या प्रस्तावाला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम अर्थात टॉप्सकडून मंजुरी
Posted On:
03 MAR 2023 3:18PM by PIB Mumbai
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि नेमबाज अनिश भानवाला यांच्या प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या प्रस्तावाला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम अर्थात टॉप्सने काल (2 मार्च रोजी) मंजुरी दिली.
ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकाविणारी भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या प्रशिक्षक विधी चौधरी आणि फिटनेस ट्रेनर श्रीकांत मदापल्ली यांना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तिच्या सोबत जाता यावे यासाठीच्या आर्थिक मदत प्रस्तावाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिंपिक सेलने (एमओसी) मान्यता दिली आहे. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप, स्विस ओपन आणि स्पेन मास्टर्स या स्पर्धांसाठी हे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. त्यांचा व्हिसा, विमानभाडे, प्रवास, निवास, बोर्डिंग, जेवणाचा आणि इतर खर्चाचा समावेश त्यात आहे. इतर खर्चासाठी त्यांना दैनिक भत्ता देखील दिला जाईल.
बैठकीदरम्यान एमओसीने भारतीय नेमबाज आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील विजेता अनिश भानवालाच्या एका प्रस्तावालाही मान्यता दिली. या प्रस्तावानुसार त्याला जर्मनीमध्ये परदेशी प्रशिक्षक राल्फ शुमन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेता येणार आहे. तो सुहलमध्ये एकूण 28 दिवस प्रशिक्षण घेणार असून मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तो त्यासाठी रवाना होणार आहे.
टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम अर्थात टॉप्सद्वारे केल्या जाणाऱ्या या आर्थिक साहाय्यामध्ये अनिशचे प्रशिक्षक, प्रशिक्षण आणि त्यासाठी नेमबाजीसाठी लागणाऱ्या बंदुकीतील गोळ्यांचा खर्च तसेच त्याचे विमान भाडे, व्हिसा, प्रवास, निवास, बोर्डिंग आणि भोजन खर्च यांचा समावेश असेल.
***
S.Bedekar/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903885)
Visitor Counter : 123