गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरात विद्यापीठाच्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबिलिटीने आयोजित केलेल्या काश्मीर महोत्सवाला दुरादृष्य प्रणालीच्या माध्यमातून केले मार्गदर्शन
देशाचा युवा वर्ग जेव्हा आपली प्रतिभा, ऊर्जा आणि उत्साह, याला स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि पीएम मुद्रा योजनेशी जोडेल, तेव्हा भारताला जगात अव्वल स्थानावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा केंद्रीय मंत्री अमित शाह यांना विश्वास
Posted On:
02 MAR 2023 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2023
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरात विद्यापीठाच्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबिलिटीने आयोजित केलेल्या काश्मीर महोत्सवाला दुरादृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, शतकानुशाताकांपासून भारत सहचार्याच्या माध्यमातून पुढे जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विविधतेने भरलेल्या देशातील सहचर्य मजबूत करण्यासाठी, अनेक उपक्रमांसह 'एक भारत श्रेष्ठ भारत'चा मूलमंत्र दिला आहे. संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि पोशाखांमधील विविधता हेच आपले बलस्थान असल्याचे ते म्हणाले. शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना, विशेषतः युवा वर्गाला, "एक भारत श्रेष्ठ भारत" ही संकल्पना जीवनाचा मंत्र म्हणून आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे.
सहकार मंत्रालयाची स्थापना करून, देशातील प्रत्येक गावाला विकास प्रणालीशी, तर गरीबातील गरीब भारतीयाला अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असल्याचे शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की हे ‘स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी’ वर्ष आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 ते 2047 या 25 वर्षांचे वर्णन 'अमृत काल' असे केले आहे. या ‘अमृत काळात’ आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे की, स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या वेळी भारत जगातील प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानावर असेल.
ते म्हणाले कि, देशाचा युवा वर्ग जेव्हा आपली प्रतिभा, ऊर्जा आणि उत्साह, याला स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि पीएम मुद्रा योजनेशी जोडेल, तेव्हा भारताला जगात अव्वल स्थानावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903776)
Visitor Counter : 262