ऊर्जा मंत्रालय
व्यवसाय सुलभता आणि पारदर्शकता, यामुळे ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक वाढत असल्याचे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
02 MAR 2023 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2023
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा (NRE) मंत्री आर.के. सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे (CERC) अध्यक्ष जिष्णू बरुआ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उूर्जा मंत्रालयाच्या दिनांक 27.2.2023 च्या आदेशानुसार जिष्णू बरुआ यांची केंद्रीय विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे नवीन अध्यक्ष, जिष्णू बरुआ यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान, आसाम पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड, अर्थात आसाम ऊर्जा वितरण कंपनीचे अध्यक्ष असताना बरुआ यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची आर. के. सिंह यांनी प्रशंसा केली, आणि म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या ऊर्जा प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. देशातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सध्याची क्षमता पुरेशी असल्याचेही त्यांनी नमूद केले. तथापि, अर्थव्यवस्था 7% च्या जवळपास वाढत आहे, तर विजेची मागणी 10% वर आहे, त्यामुळे पुढील दशक किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वीज यंत्रणेला तयार असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. व्यवसाय सुलभता आणि पारदर्शकता, यामुळे ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक वाढत असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. तथापि, या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सक्षम वातावरण सुनिश्चित करण्यासाठी काम करत राहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारने, विद्युत नियामक आयोग कायदा, 1998 च्या तरतुदीं अंतर्गत, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाची (CERC) स्थापना केली होती. विद्युत नियामक आयोग हा विद्युत कायदा, 2003 ची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचा केंद्रीय आयोग असून, त्याने विद्युत नियामक आयोग (ERC) कायदा, 1998 रद्द करून, त्याची जागा घेतली आहे. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि अध्यक्ष, केंद्रीय विद्युत प्राधिकरणासह इतर चार सदस्य असतात, जे आयोगाचे पदाधिकारी सदस्य असतात.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1903636)