पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागिदारी हा केवळ डेन्मार्क आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण युरोप आणि संपूर्ण जगासाठी 'लाइफ'सह शाश्वत जीवनशैलीला चालना देण्यासाठी कल्पना, सर्वोत्तम पद्धती, ज्ञान, तंत्रज्ञान, क्षमता निर्माण करण्यासाठी एक योग्य मंच - भूपेंद्र यादव
Posted On:
28 FEB 2023 2:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2023
भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागिदारी हा केवळ डेन्मार्क आणि भारतातच नव्हे तर संपूर्ण युरोप आणि संपूर्ण जगासाठी 'लाइफ'सह शाश्वत जीवनशैलीला चालना देण्यासाठी कल्पना, सर्वोत्तम पद्धती, ज्ञान, तंत्रज्ञान, क्षमता निर्माण करण्यासाठी एक योग्य मंच असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

भारत –डेन्मार्क: हरित आणि शाश्वत विकास परिषदेला त्यांनी आज नवी दिल्लीत संबोधित केले. 28 सप्टेंबर 2020 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून परिषदेत "हरित धोरणात्मक भागिदारीचा" प्रारंभ केल्यापासून, हरित आणि शाश्वत विकासाला चालना देण्यावर द्विपक्षीय सहकार्य केंद्रित आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मे 2022 मधील डेन्मार्कच्या भेटीदरम्यान, भारत आणि डेन्मार्क यांनी हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा आणि सांडपाणी व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करून हरित धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. डेन्मार्क आणि भारत यांच्यातील हरित धोरणात्मक भागीदारीमुळे देशांमधील मैत्रीपूर्ण आणि सहकारी संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला असे त्यांनी सांगितले. पॅरिस कराराच्या महत्त्वाकांक्षी अंमलबजावणीस हातभार लावतील अशी हवामान आणि उर्जे संबंधित अतिशय महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उद्दिष्टे भारत आणि डेन्मार्कने निश्चित केली आहेत. दोन्ही देश एकत्रितपणे जगाला दाखवून देऊ शकतात की महत्त्वाकांक्षी हवामान आणि शाश्वत ऊर्जा उद्दिष्टे साध्य करणे शक्य आहे असे यादव म्हणाले.

पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या संसाधनांशी आपली जीवनशैली सुसंगत आहे याची प्रत्येकाने खातरजमा करणे आवश्यक आहे यावर यादव यांनी यावर भर दिला.


S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1903015)
अभ्यागत कक्ष : 110