कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

भ्रष्टाचार जराही खपवून घेतला जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी एकत्रित कृतीसाठी हरियाणा इथल्या जी- 20 कार्य समूहाच्या बैठकीत भारत पुन्हा ठाम भूमिका मांडणार त्याचबरोबर जागतिक स्तरावर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जी-20 समूहाची वचनबद्धता दृढ करणार


हरियाणात गुरुग्राम येथे 1ते 3 मार्च 2023 या कालावधीत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आयोजित केलेल्या (DoPT) जी-20 कार्यसमूहाच्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी बैठकीचे उदघाटन डॉ जितेंद्र सिंह करणार

भ्रष्टाचार जराही खपवून घेतला जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी भारत एकत्रित कृतीसाठी हरियाणा इथल्या जी- 20 कार्य समूहाच्या बैठकीत पुन्हा ठाम भूमिका मांडणार असून जागतिक स्तरावर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जी-20 समूहाची वचनबद्धता दृढ करणार असल्याचे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री

Posted On: 27 FEB 2023 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2023

 

डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. येत्या 1 ते 3 मार्च 2023 या कालावधीत हरियाणातील गुरुग्राम येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीने (DoPT) जी-20 कार्यसमूहाची पहिली भ्रष्टाचार विरोधी बैठक (ACWG) आयोजित करण्यात आली आहे. 

या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यसमूहाच्या बैठकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की,अभूतपूर्व आर्थिक, भौगोलिक राजकीय आणि हवामान आव्हाने समोर उभी ठाकली असताना भारताला  जी-20 अध्यक्षपद मिळालेले आहे, तथापि, जागतिक स्तरावर निराशाजनक आर्थिक परिस्थिती असताना देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)आणि इतर जागतिक एजन्सींनी वर्णन केल्यानुसार भारत एक उज्ज्वल स्थान म्हणून उदयास आला आहे आणि म्हणूनच, उत्तर-दक्षिण विभागातील महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत सुयोग्य भूमिका बजावेल, असे डॉ.सिंह पुढे म्हणाले.ते पुढे म्हणाले की,भारत भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुता सुनिश्चित करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी जी -20 वचनबद्धतेची खात्री करण्यासाठी एकत्रित कारवाई करण्यासाठी दुजोरा देईल.

वसुधैव कुटुंबकम” किंवा “एक पृथ्वी. एक कुटुंब. एक भविष्य”,या भारताच्या जी-20 अध्यक्षपदावरून मांडलेल्या संकल्पनेचा संदर्भ देत“डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली, जी-20 अध्यक्षपदाच्या भारताच्या काळात  कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाची पहिली बैठक आयोजित करत  आहे. डॉ.सिंह पुढे म्हणाले, की गुरुग्राम येथे होणाऱ्या तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान, 20 सदस्य देशांमधील 90 हून अधिक प्रतिनिधी, 10 आमंत्रित देश आणि 9 आंतरराष्ट्रीय संस्था मिळून आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा मजबूत करण्यावर तपशीलवार चर्चा करतील. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सादर केले जाणारे केलेले योग सत्र, ऐतिहासिक स्थळांना भेटी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक पाककृती याद्वारे प्रतिनिधी भारताच्या संस्कृतीचा अनुभवही घेतील.

डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की 2010 मध्ये झालेल्या स्थापनेपासूनच, जी-20 भ्रष्टाचार विरोधी कार्यसमूह (ACWG) जी-20 देशांमधील भ्रष्टाचार विरोधी उपक्रमांना मार्गदर्शन करण्यात आघाडीवर आहे. जी-20च्या  भ्रष्टाचार विरोधी कार्यसमूहाच्या (ACWG) बैठकांमध्ये एक देश अध्यक्ष (अध्यक्ष देश) आणि एक देश सह-अध्यक्ष देश असतो.

भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी पारदर्शक नियामक आराखडा आणि प्रभावी अंतर्गत नियंत्रण यंत्रणा ही काळाची गरज असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.बैठकीचा भाग म्हणून, सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी आयसीटीची आवश्यकता या विषयावर  एक उपपरीषद देखील आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती सिंह यांनी दिली. त्यात जागतिक स्तरावर भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आयसीटीची आवश्यकता तसेच भारताने त्याचा मुकाबला करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती दिली जाईल.नागरिक-केंद्रित प्रशासकीय मॉडेल लागू करण्यासाठी,भ्रष्टाचार  शोधून काढण्यासाठी आणि माहिती आणि तंत्रज्ञानाची भ्रष्टाचार रोखण्यासाठी असलेली भूमिका दाखवून,उच्च पारदर्शकतेसाठी सामान्य आयसीसी(ICT) प्लॅटफॉर्म तयार करून अनुभवांची देवाणघेवाण करत सर्वोत्तम सामायिकरणासाठी भारत आपल्या अनुभवाचा उपयोग  करेल. 

भ्रष्टाचारविरोधी जागरूकता निर्माण करण्यासाठी, शैक्षणिक ज्ञान प्रदान करण्यासाठी, क्षमता निर्माण करण्यासाठी आणि सिव्हिल सोसायटी 20, थिंक टँक 20, महिला 20 आणि व्यवसाय 20 यासारख्या मंचांच्या अनुभवाचे उत्तम प्रकारे लाभ  मिळवून देण्यासाठी पहिली एसीडब्ल्यूजी (ACWG) बैठक लाभदायक ठरेल अशी आशा डॉ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.

 

* * *

N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1902800) Visitor Counter : 175