मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाकडून 22 आणि 23 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरातल्या आकांक्षी जिल्ह्यांमधील 4000 गावांमध्ये समावेशक विकासासाठी उद्यमशीलता योजना जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
25 FEB 2023 5:12PM by PIB Mumbai
- केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले आणि राष्ट्रीय पशुधन मिशन आणि राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनांविषयी माहिती दिली
- पशुसंवर्धन सचिवांचा उद्यमशीलता विकास आणि पशुखाद्य आणि चारा उत्पादन विकासासह ग्रामीण कुक्कुटपालन, मेंढी पालन, बकरी पालन आणि वराह पालन यामध्ये प्रजोत्पादन वाढीवर भर
- शाश्वत आणि फायदेशीर पद्धतीने पशुधनाच्या उत्पादकतेत वाढ करण्याचा विभागाचा दृष्टिकोन
- सामाईक सेवा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 2 लाख शेतकरी या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने देशभरातल्या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये 4000 गावांमध्ये सामायिक सेवा केंद्रांच्या माध्यमातून उद्यमशीलता आणि इतर लाभार्थीभिमुख योजनांविषयी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकास सचिव राजेश कुमार सिंग यांनी अनुक्रमे 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांना या योजनांविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली त्याच बरोबर प्रत्यक्ष सामायिक सेवा केंद्रांच्या माध्यमातूनच या योजनांच्या पोर्टलवरून या योजनांसाठी कशाप्रकारे अर्ज करावा त्याचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. या सामायिक सेवा केंद्राद्वारे सुमारे दोन लाख शेतकरी या जागरूकता कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की राष्ट्रीय पशुधन मिशन आणि राष्ट्रीय गोकुळ मिशन मध्ये आता ब्रीडर फार्म उद्योजक आणि चारा उद्योजकांचा संपूर्ण भाग आहे. राष्ट्रीय पशुधन मिशन (एनएलएम) ग्रामीण उद्यमशीलता निर्माण करण्यात आणि बेरोजगार युवकांना अधिक चांगल्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आणि चारा आणि पशुखाद्य क्षेत्रातील विकासासह पशुपालक शेतकऱ्यांना गुरे, डेरी, पोल्ट्री, बकऱ्या, मेंढ्या, वराह पालनासाठी पशुधन उपलब्ध होईल आणि आत्मनिर्भर भारताचा मार्ग खुला होईल.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना राजेश कुमार सिंग म्हणाले की या योजना उद्यमशीलता विकास आणि ग्रामीण कुक्कुटपालन, मेंढीपालन, बकरी पालन आणि वराह पालन तसेच चारा आणि पशुखाद्य या क्षेत्रांमध्ये विकासावर भर देतील. कुक्कुटपालन उत्पादकतेत आणि दूध आणि मांस उत्पादनात वाढ करण्यासाठी, पोषण सुरक्षा साध्य करण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि देशाच्या आर्थिक भरभराटीसाठी सरकार विविध योजना/ कार्यक्रम राबवत आहे. या क्षेत्रासाठी या विभागाचा सखोल दृष्टीकोन शाश्वत आणि फायदेशीर पद्धतीने पशुधनाच्या उत्पादकतेत वाढ करण्याशी संबंधित आहे. या कार्यक्रमाचा प्रभाव आणि यश याची माहिती विविध प्रकारची सादरीकरणे आणि व्हिडिओंच्या माध्यमातून यावेळी समजावून सांगण्यात आली.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902338)
Visitor Counter : 442