गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मध्य प्रदेशातील सतना येथे शबरी माता जयंतीनिमित्त आयोजित 'कोल जनजाती महाकुंभ'ला केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2023 8:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मध्य प्रदेशातील सतना येथे शबरी माता जयंतीनिमित्त आयोजित 'कोल जनजाती महाकुंभ'ला संबोधित केले. माँ शारदा शक्तीपीठात त्यांनी प्रार्थना केली. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
507 कोटी रुपयांच्या 70 विकासकामांची पायाभरणी आणि 26 कोटी रुपयांच्या इतर अनेक कामांचा शुभारंभ आज येथे झाला. कोल समाज आणि आदिवासी बंधू भगिनींच्या कल्याणासाठी शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश सरकारने अनेक कामे केली आहेत, असे अमित शहा यावेळी म्हणाले.
अमित शहा म्हणाले की, कोल समाजाचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 200 कोटी रुपये खर्चून देशभरात आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयांची स्थापना करत आहे, 1831 च्या कोल क्रांतीतील शौर्याचे वर्णन या संग्रहालयांमध्ये करण्यात आले आहे. गोंड महाराणी दुर्गावती यांचे शौर्य असो, राणी कमलापती यांचे बलिदान असो, स्वातंत्र्यसैनिक बुद्ध भगत आणि जोवा भगत असो, या सर्वांच्या स्मृती मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली जागवल्याचे शहा म्हणाले.
मागील सरकारच्या काळात आदिवासी समाजासाठी 24,000 कोटी रुपये अर्थसंकल्पात देण्यात आले होते, ते वाढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते सुमारे 90,000 कोटी रुपये केल्याची माहिती शहा यांनी दिली.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902155)
आगंतुक पटल : 207