विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आगामी जी-20 शिखर परिषदेच्या विज्ञान-20 बैठकांच्या तयारीसंदर्भात केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय संयुक्त आढावा बैठक संपन्न
Posted On:
23 FEB 2023 5:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आगामी जी-20 शिखर परिषदेच्या विज्ञान-20 बैठकांच्या तयारीसंदर्भात आज उच्चस्तरीय संयुक्त आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.
या बैठकीला भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद यांच्यासह विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, पृथ्वी विज्ञान, अवकाश आणि अणुऊर्जा या सहाही विज्ञान मंत्रालये आणि विभागांचे सचिव उपस्थित होते.
डॉ जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग 1 मार्च ते 3 मार्च 2023 या कालावधीत हरियाणाच्या गुरुग्राम येथील लीला हॉटेलमध्ये "पहिली भ्रष्टाचारविरोधी कार्यगट बैठक आयोजित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून, या कालावधीत जवळपास 40 बैठका आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
आजच्या बैठकीत जी-20 विज्ञान संमेलनाच्या तयारीव्यतिरिक्त, विज्ञान पुरस्कारांचा आढावा, विज्ञान प्रसार आणि संकल्प बैठका संपल्यानंतर नवीन संप्रेषण संरचना तयार करणे या मुद्यांवर देखील चर्चा झाली.
एस-20 शिखर परिषद आणि इतर कार्यक्रम या व्यतिरिक्त, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे सोपवण्यात आलेला आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे रिसर्च इनोव्हेशन इनिशिएटेड गॅदरिंग (RIIG) आणि संबंधित कार्यक्रम असल्याची माहिती डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली.
कोईम्बतूर येथे “नवोपक्रम आणि शाश्वत विकासासाठी हानीकारक विज्ञान” या संकल्पनेवर आधारित विज्ञान-20 शिखर परिषद 21 ते 22 जुलै 2023 या कालावधीत आयोजित केली जाईल.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901764)
Visitor Counter : 168