रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

उत्तर प्रदेशातील संपूर्ण ब्रॉडगेज रेल्वे जाळ्याचे विद्युतीकरण करून भारतीय रेल्वेने गाठला एक महत्त्वपूर्ण टप्पा


उल्लेखनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय रेल्वेची प्रशंसा

यासह, सहा विभागीय रेल्वे ( पूर्व तटीय रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे ) पूर्णपणे विद्युतीकृत

तसेच, हायली युटिलाइज्ड नेटवर्क (एचयुएन -5), झाशी-मुझफ्फरपूर-कटनी मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण

Posted On: 22 FEB 2023 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी  2023

भारतीय रेल्वेने काल रेल्वे विद्युतीकरणात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. ईशान्य रेल्वेमधील सुभागपूर-पाचपेरवा ब्रॉडगेज (बीजी ) मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण करण्यासह, भारतीय रेल्वेने उत्तर प्रदेशातील सर्व ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. यामुळे या प्रदेशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि या प्रदेशातील गाड्यांच्या वेगात सुधारणा होईल.

ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वेची प्रशंसा केली आहे.

या कामगिरीसह , भारतीय रेल्वेने पूर्व तटीय रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे या सहा विभागीय रेल्वेमध्ये ब्रॉडगेज  मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे , हायली युटिलाइज्ड नेटवर्क (एचयुएन -5), झाशी-मुझफ्फरपूर-कटनी रेल्वेमार्गाचे आता पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.

यामुळे झाशी -लखनौ-बाराबंकी-बुर्हवाल, गोंडा-आनंदनगर-गोरखपूर-वाल्मिकीनगर-सुगौली, मुझफ्फरपूर-बचवाडा आणि नरकटियागंज- रक्सौल -सीतामढी-दरभंगा-समस्तीपूर, सीतामढी-मुझफ्फरपूर-हाझीपूर यासह भटनी-वाराणसी नैनी (अलाहाबाद)-माणिकपूर-सतना-कटनी आणि छपरा-वाराणसी या दरम्यान कनेक्टिव्हीटीमध्ये सुधारणा होणार आहे.

आरकेएमच्या 85% विद्युतीकरणासह, भारतीय रेल्वे 100 टक्के विद्युतीकरणाचे अभियान पूर्ण करण्यासाठी आणि जगातील सर्वात मोठे हरित रेल्वे जाळे बनण्यासाठी वेगाने प्रगती करत आहे.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1901354) Visitor Counter : 664


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi