सांस्कृतिक मंत्रालय
G20 च्या सांस्कृतिक कार्यगटाची पहिली बैठक उद्यापासून मध्य प्रदेशातील खजुराहो येथे सुरू होणार
या बैठकीत सदस्य देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहभागासह कार्यगटाची चार सत्रं नियोजित आहेत
Posted On:
21 FEB 2023 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2023
G20 च्या सांस्कृतिक कार्यगटाची पहिली बैठक उद्यापासून मध्य प्रदेशातील खजुराहो येथे सुरू होणार आहे. 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ही बैठक होणार आहे.
केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. के. रेड्डी; मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते उद्या महाराजा छत्रसाल परिषद केंद्र इथे “Re(ad)dress: रिटर्न ऑफ ट्रेझर्स” या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
खजुराहो विमानतळावर आगमनानंतर, बधाई आणि राय या लोककला सादरीकरणाने प्रतिनिधींचे स्वागत केले जाईल . प्रतिनिधींना पारंपरिक कला आणि संस्कृतीची ओळख करून दिली जाईल. तसेच बैठकीदरम्यान पेपर मॅश ,ब्लॉक प्रिंटिंग, मेंदी कला यासारख्या डीआयवाय उपक्रमांत सहभागी होतील.
बैठकीच्या पहिल्या दिवशी मिलेट मॅन म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री नेक राम यांना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 साजरे करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
बैठकीच्या इतर दिवशी खजुराहो नृत्य महोत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेस्टर्न ग्रुप ऑफ टेंपल्सलाही हे प्रतिनिधी भेट देतील. तसेच त्यांना पन्ना व्याघ्र प्रकल्पाचीही सफर घडवून आणली जाईल. या बैठकीला 125 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीदरम्यान महाराजा छत्रसाल परिषद केंद्र इथे कार्यगटाची चार सत्रं आयोजित केली आहेत, ज्यामध्ये G20 सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संघटना आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होतील. उद्घाटन सत्राला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी संबोधित करतील. सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. या सत्रात, ट्रोइका (इंडोनेशिया आणि ब्राझील) द्वारे सादरीकरण केले जाईल.
खजुराहो जवळील छत्तरपूर येथे आज प्रसारमाध्यमांना माहिती देताना संयुक्त सचिव लिली पांडेय म्हणाल्या की भारताच्या G20 अध्यक्षतेअंतर्गत खजुराहो, हम्पी, भुवनेश्वर, वाराणसी येथे सांस्कृतिक कार्यगटाच्या चार बैठका आयोजित केल्या जात आहेत. वसुधैव कुटुंबकम"- एक पृथ्वी · एक कुटुंब · एक भविष्य ही या वर्षीची G20 ची संकल्पना आहे .
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901194)
Visitor Counter : 236