कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

जी- 20 चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन शृंगला यांनी सनदी अधिकाऱ्यांना लोकांचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे केले आवाहन

Posted On: 19 FEB 2023 5:47PM by PIB Mumbai

 

मालदीवच्या सनदी अधिकाऱ्यांसाठीचा एक सप्ताहाचा एकविसावा क्षमता बांधणी कार्यक्रम (CBP) आणि जम्मू काश्मीरच्या अधिकाऱ्यांसाठीचा दोन आठवड्याचा पाचवा कार्यक्रम अशा दोन्ही कार्यक्रमांची सांगता आज नवी दिल्लीत झाली. या कार्यक्रमातमालदिवचे 25 सनदी अधिकारी आणि जम्मू काश्मीरचे 38 सनदी अधिकारी सहभागी झाले होते. मसूरी आणि दिल्ली इथे हे प्रशिक्षण अभियान घेण्यात आले. केंद्र सरकारची स्वायत्त संस्था, राष्ट्रीय सुप्रशासन केंद्रातर्फे पथदर्शी कार्यक्रम म्हणून हे क्षमता बांधणी कार्यक्रम राबवले जातात.

या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाला, जी-20 चे मुख्य समन्वयक, हर्षवर्धन शृंगला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलतांना, शृंगला यांनी लवचिक, शाश्वत विकासासाठी, सर्वासमावेशक आणि गतिमान विकासाच्या गरजेवर भर दिला. तसेच, लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरावरही त्यांनी भर दिला. लोकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, संकल्पनात्मक आराखडा तयार करावा आणि आपला प्रदेश तसेच देशातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

Description: Image

लोकांशी संबंध प्रस्थापित करणे आणि भागीदारीला प्रोत्साहन देऊन, देशांमध्ये पोषक वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. माजी परराष्ट्र सचिव श्रुंगला यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खाली सरकारच्या कामगिरीचीही माहिती दिली. तसेच, सर्व सनदी अधिकाऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवून त्यांचे जीवनमान अधिक सुखकर करण्यासाठी परिश्रम करावेत, असे आवाहन त्यांना केले. एनसीजीजीचा क्षमता बांधणी उपक्रम, सर्वांना एकत्रित शिकण्याची आणि आपल्या विचारांचे आदान प्रदान करत, जीवनमान सुधारण्याच्या दिशेने एकत्रित काम करण्याविषयी चर्चा करण्यासाठीचा एक उत्तम मंच प्रदान करतो, यावरही त्यांनी भर दिला.

Description: Image

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1900582) Visitor Counter : 152