ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अन्न महामंडळाने तिसऱ्या ई-लिलावात देशातील 620 डेपोच्या माध्यमातून 11.72 लाख मेट्रिक टन गहू उपलब्ध केला


भारतीय अन्न महामंडळाकडून तिसरा ई-लिलाव 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल

Posted On: 18 FEB 2023 10:32AM by PIB Mumbai

भारतीय अन्न महामंडळातर्फे, तिसर्‍या ई-लिलावात, देशभरातील 620 डेपोमधून सुमारे 11.72 लाख मेट्रिक टन  गहू उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तिसर्‍या ई-लिलावासाठी, 17 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 10:00 वाजेपर्यंत एम जंक्शनच्या ई-पोर्टलवर नोंदणी केलेल्या बोलीधारकांना 22 फेब्रुवारी 2023 रोजी ई-लिलावात सहभागाई होण्याची परवानगी दिली जाईल. बयाणा रक्कम जमा करण्याची आणि अपलोड करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 2:30 पर्यंत आहे. तिसरा ई-लिलाव 22 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरू होईल.

केंद्र सरकारने देशभरात खुल्या बाजारात विक्री योजनेद्वारे गव्हाच्या विक्रीसाठी सुधारित राखीव किंमत ठेवली आहे. आता एफएक्यू गव्हाची राखीव किंमत देशभरात 2150 रुपये प्रति क्विन्टल युआरएस गव्हाची किंमत 2125 रुपये प्रति क्विंटल असेल. गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती आणखी खाली आणण्यासाठी देशभरात कमी समान राखीव किमतीत गहू उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन राखीव किमती गव्हाच्या तिसऱ्या ई-लिलावाद्वारे विक्री पासून लागू झाल्या आहेत, जो बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरात होणार आहे.

देशात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी, मंत्रिगटाने केलेल्या शिफारशीनुसार, भारतीय अन्न महामंडळ 30 लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा केंद्रीय साठ्यातून खुल्या बाजारात विक्री योजना अंतर्गत विविध मार्गांने बाजारात आणत आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या ई-लिलावादरम्यान एकूण 12.98 लाख मेट्रिक टन  गहू विकण्यात आला, ज्यापैकी बोलीदारांनी 8.96 लाख मेट्रिक टन आधीच  उचलला आहे, परिणामी गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी झाल्या आहेत.

देशभरात एकसमान राखीव किंमतीमध्ये सुधारणा करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेमुळे देशभरातील ग्राहकांना फायदा होईल आणि गहू आणि पिठाच्या किमती आणखी कमी होतील.

***

Shilpa/Sushama K/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900329) Visitor Counter : 212