अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने 11.94 किलो हेरॉईन जप्त करून त्यात सहभागी 3 जणांना मुंबईत घेतले ताब्यात
Posted On:
15 FEB 2023 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2023
मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय ) अधिकार्यांनी काल केनिया एअरवेजने हरारेहून नैरोबी मार्गे मुंबईला येणाऱ्या एका भारतीय महिला प्रवाशाला अडवले. या प्रवाशाच्या सामानाची तपासणी केल्यानंतर 11.94 किलो पिवळसर पांढऱ्या रंगाचे दाणे जप्त करण्यात आले. अंमली पदार्थांच्या क्षेत्रीय चाचणी तपासणी संचासह चाचणी केल्यानंतर एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत समाविष्ट असलेला अंमली पदार्थ “हेरॉइन” पदार्थाची चाचणी सकारात्मक आली.
जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे वजन एकत्रितपणे 11.94 किलो असून, त्याची अवैध बाजारात किंमत अंदाजे 84 कोटी रुपये आहे.हा पदार्थ ट्रॉली बॅगमध्ये आणि फाइल फोल्डरमध्ये कल्पकतेने लपवण्यात आला होता.
महिला प्रवाशाने सांगितले की, हे अंमली पदार्थ तिच्याकडे हरारे येथे देण्यात आले होते आणि ते मुंबईतील दोन व्यक्तींना देण्यात येणार होते. तत्परतेने कृती करत,महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळाच्या बाहेर प्रवासी आणि प्रतिबंधित वस्तू घेण्यासाठी आलेल्या प्राप्तकर्त्यांना ओळखले आणि पकडले.एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार प्रवाशासह इतर 2 प्राप्तकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899624)
Visitor Counter : 139