संरक्षण मंत्रालय
एरो इंडिया 2023 मध्ये स्टार्ट अप्सची नवीन ऊर्जा, वचनबद्धता आणि उत्साहाचे संरक्षण मंत्र्यांनी केले स्वागत
संरक्षण मंत्र्यांनी "सायबरसुरक्षा" वर डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज (DISC-9)च्या 9 व्या आवृत्तीचा केला प्रारंभ
भारतीय गुंतवणूकदार iDEX इन्व्हेस्टर हबद्वारे 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक तारण ठेवले
Posted On:
15 FEB 2023 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2023
एरो इंडिया 2023 मधील स्टार्ट-अप मंथन मध्ये आज बोलताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्टार्ट-अप्स हे नवीन ऊर्जा, नवीन वचनबद्धता आणि नवीन उत्साह याप्रमाणे आहे असे सांगितले. ते म्हणाले की, स्टार्ट-अप्स नवीन तंत्रज्ञान व्यवस्था स्वीकारण्यासाठी उत्सुक असून भारताच्या प्रगतीसाठी ते अनिवार्य करत आहेत.
प्रत्येक क्षेत्रात भारतीय स्टार्ट-अपची वाढ झाली असून ही संख्या आज अंदाजे एक लाखापर्यंत गेली आहे, ज्यात 100 पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत असे सांगत . संरक्षण मंत्र्यांनी स्टार्ट-अपची प्रशंसा केली . ते पुढे म्हणाले की यातून आमच्या तरुणांचा उत्साह आणि अभिनव संशोधन करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. राजनाथ सिंह यांनी "सायबरसुरक्षा" वरील डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंजेस (DISC 9) च्या नवव्या आवृत्तीचा प्रारंभ केला तसेच 28 प्रॉब्लम स्टेटमेंट्स आणि iDEX गुंतवणूकदार हबचा देखील प्रारंभ केला . आघाडीच्या भारतीय गुंतवणूकदारांनी iDEX गुंतवणूकदार हब अंतर्गत यापूर्वीच 200 कोटी रुपयांहून अधिक तारण ठेवले आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (DIO) म्हणजेच संरक्षण नवोन्मेषी संघटने अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) अर्थात नवोन्मेषी संरक्षण उत्कृष्टता उपक्रमाने देशभरातील प्रतिभेला पुढे येण्यास सक्षम बनवले आहे. आपली सेवा दले , सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम , तटरक्षक दल तसेच गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संघटना आपल्या तरुणांना ‘प्रॉब्लेम स्टेटमेंट्स’ देत आहेत, जे प्रत्येक वेळी आव्हानाला सामोरे जात आहेत, असे त्यांनी नमूद केले. भारत आपल्या तरुणांना नवोन्मेषासाठी पाठिंबा देत आहे आणि त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी आणि स्वदेशी संरक्षण उत्पादने तयार करून आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी सक्षम बनवले जात आहे असे संरक्षण मंत्री म्हणाले. "स्टार्ट अप मंथन" ला स्टार्ट-अप, उद्योग आणि इतर सहभागींकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करताना त्यांनी विश्वास व्यक्त केला की, भारत नवोन्मेष क्षेत्रात जगासाठी दीपस्तंभ म्हणून उदयास येईल. ते पुढे म्हणाले की, हा कार्यक्रम भारतीय संरक्षण स्टार्ट-अप परिसंस्थेचा उत्सव आहे आणि iDEX च्या यशाचा निदर्शक आहे.
संरक्षण मंत्री असेही म्हणाले केले की, स्टार्ट-अप आणि एमएसएमई या क्षेत्रांकडे रोजगार निर्मितीची क्षमता असल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने यांच्याकडून खरेदीसाठी एक सोपी आणि फास्ट ट्रॅक (जलद) प्रक्रिया प्रस्थापित केली आहे. ते म्हणाले की आयडेक्स (iDEX) ने संरक्षण परिसंस्थेमधील आत्मनिर्भरतेसाठी योगदान दिले आहे, आणि त्यांनी नवीन संधींद्वारे उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी आणि धोरणात्मक हस्तक्षेपांद्वारे तंत्रज्ञानाचा विकास सुलभ करण्यासाठीच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
‘DISC 9’ हे आयडेक्स (iDEX) चे गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (i4C), अर्थात भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्राबरोबरचा पहिला सहयोग (गठन) आहे. आपल्या संरक्षण उद्योगात आयडेक्स (iDEX) ने निर्माण केलेला सखोल प्रभाव आणि स्वारस्य प्रदर्शित करून, ही आव्हाने सेवा, DPSUs आणि गृह मंत्रालयाकडून दूर करण्यात आली आहेत.
संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीला गती देणे आणि गुंतवणूकदारांना संधी आणि नवोन्मेषाचा एकत्रित दृष्टिकोन देणे, हे ‘आयडेक्स (iDEX) गुंतवणूकदार केंद्राचे’चे उद्दिष्ट आहे. डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (DIO) ने देखील मंथन मध्ये आघाडीच्या गुंतवणूकदारांबरोबर सामंजस्य करार केले. अॅक्सिस बँकेबरोबर आणखी एक सामंजस्य करार करण्यात आला. संरक्षण क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी ‘डीआयओ’ने इस्रो (ISRO), ईन-स्पेस (IN-SPACE) आणि ISpA बरोबर देखील सामंजस्य करार केले आहेत. भविष्यात संभाव्य स्टार्ट-अप आव्हाने सुरू करण्यासाठी, सीमा रस्ते संघटनेबरोबर (बीआरओ) आणखी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. इनोवेशन फॉर डिफेन्स (Innovate4Defence) इंटर्नशिप (i4D) ची चौथी आवृत्ती देखील सुरू करण्यात आली, ज्यामध्ये संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले.
संरक्षण मंत्र्यांनी भारतीय सैन्याच्या स्वदेशी संरक्षण संशोधन, डिझाईन, विकास आणि उत्पादन परिसंस्थेसाठी 110 समस्या विधानांचे (प्रॉब्लेम स्टेटमेंट्स) संकलन देखील जारी केले. ही समस्या विधाने भारतीय लष्करापुढील तांत्रिक आव्हाने आणि शस्त्रास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, मेटाव्हर्स, रोबोटिक्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, सायबर, दारूगोळ्याचे स्मार्ट व्यवस्थापन यासारख्या विशिष्ट विभागात पाळत ठेवण्यासाठीच्या आणि अग्नि नियंत्रण प्रणाली यासारख्या विविध क्षेत्रांमधील गरजांवर प्रकाश टाकतात. iDEX-DIO ने SPRINT उपक्रमा अंतर्गत सुरू केलेल्या भारतीय नौदल प्राइम चॅलेंजच्या विजेत्यांबरोबरच्या 200 व्या करारावरही स्वाक्षरी केली.
S.Bedekar/Sushama/Rajashree/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899493)
Visitor Counter : 144