पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएमडीसीने तिसर्‍या तिमाहीतील उत्पादनाची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली

प्रविष्टि तिथि: 15 FEB 2023 11:23AM by PIB Mumbai

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने (एनएमडीसी)  आर्थिक वर्ष 23 च्या तिसर्‍या तिमाहीत 10.66 दशलक्ष टन उत्पादनासह तिसर्‍या तिमाहीतील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली . एनएमडीसीने 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंडळाच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांसाठी 11,816 कोटी रुपयांची  उलाढाल नोंदवली. या नऊ महिन्यांसाठी कंपनीचा करपूर्व नफा  4351 कोटी रुपये तर कर पश्चात नफा  3252 कोटी रुपये इतका आहे.

एनएमडीसीने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत  लोह खनिजाचे 10.66 दशलक्ष टन  उत्पादन केले आणि 9.58 दशलक्ष टन इतकी  लोह खनिजाची विक्री केली. पहिल्या तीन तिमाहीत एकत्रित उत्पादन आणि विक्रीचे आकडे अनुक्रमे 26.69 दशलक्ष टन आणि 25.81 दशलक्ष टन होते.

एनएमडीसीने  3.75 प्रति समभाग अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

या कामगिरीबाबत बोलताना एनएमडीसीचे  मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुमित देब म्हणाले की, लोह आणि पोलाद उद्योग हा भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा  कणा आहे आणि यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्च  वाढण्यावर भर देण्यात आल्यामुळे देशांतर्गत पोलादाची मागणी वाढेल. लोहखनिजाचे वाढते उत्पादन आणि कंपनीमध्ये पुनर्गुंतवणूक करता येऊ शकेल असे भांडवल वाढल्यामुळे  मागणी पूर्ण करण्यासाठी एनएमडीसी सज्ज आहे.  आतापर्यंतच्या तिसऱ्या तिमाहीतील सर्वोत्तम  उत्पादनाबबद्दल मी एनएमडीसीच्या टीमचे अभिनंदन करतो.”

 ***

Gopal C/Sushma/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 1899365) आगंतुक पटल : 236
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu