संरक्षण मंत्रालय

संरक्षण सचिवांनी ब्रिटनच्या प्रतिनिधीमंडळाची घेतली भेट

Posted On: 14 FEB 2023 9:13AM by PIB Mumbai

संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी ब्रिटनचे संरक्षण खरेदी राज्यमंत्री अॅलेक्स  चॉक यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. 13 फेब्रुवारी 2023 रोजी  पंतप्रधानांच्या हस्ते एरो इंडिया 2023 चे उद्घाटन झाले, त्यानिमित्ताने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

संभाव्य संरक्षण औद्योगिक सहकार्य क्षेत्रांसह अनेक विद्यमान तसेच भविष्यातील संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. ब्रिटनच्या मंत्र्यांसोबत भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस हे देखील  होते.

***

 सुवर्णा बेडेकर/ सुषमा काणे//सी यादव

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1899050) Visitor Counter : 158