आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वस्थ मन, स्वस्थ घर (निरोगी मन निरोगी घर)


देशातल्या सर्व 1.56 लाख आयुष्मान भारत - आरोग्य केंद्रांवर दर महिन्याच्या 14 तारखेला आरोग्य मेळे आयोजित केले जाणार

Posted On: 13 FEB 2023 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023

निरोगी जीवनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या “स्वस्थ मन, स्वस्थ घर” (निरोगी मन निरोगी घर) मोहिमेचा एक भाग म्हणून, दर महिन्याच्या 14 तारखेला देशभरातल्या संपूर्ण 1.56 लाख आयुष्मान भारत – आरोग्य केंद्रांमध्ये  आरोग्य मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या देशव्यापी आरोग्य मेळ्यांचा एक भाग म्हणून योग, झुंबा, टेलीकन्सल्टेशन (दूरध्वनी वरून वैद्यकीय माहिती देणे),  पोषण अभियान, असंसर्गजन्य रोग तपासणी आणि औषध वितरण, सिकलसेल रोग तपासणी यांसारखे उपक्रम हाती घेतले जातील.

याच अनुषंगाने, 14 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व आयुष्मान भारत- आरोग्य केंद्रांमध्ये  सायकल जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये सायक्लोथॉन, सायकल रॅली किंवा सायकल फॉर हेल्थ आदी कार्यक्रम होतील. शारीरिक आणि मानसिक स्‍वस्‍थता याच्याशी निगडित विविध विषय तसेच पर्यावरण स्नेही वाहतूक या संदर्भात यावेळी जागरूकता आणि प्रचार केला जाईल.

आपल्या आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्यांना तसेच सायकलिंग प्रेमींना कळकळीचे आवाहन करत असताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांनाही त्यांच्या जवळच्या आयुष्मान भारत – आरोग्य केंद्रांमध्ये आयोजित सायकलिंग कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

"आपले शरीर निरोगी, तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी सायकलिंग हा एक उत्तम मार्ग आहे."

"तुम्हाला वाटेल तितकी लांब किंवा कमीत कमी अंतरापर्यंत सायकल चालवा, पण सायकल नक्की चालवा!", असे आवाहन डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे.

स्वस्थ मन, स्वस्थ घर”(निरोगी मन निरोगी घर) ही नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत वर्षभर चालणारी मोहीम आहे. ही मोहीम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ,   आरोग्य आणि निरोगी जीवन पद्धतीला प्रोत्साहन देईल. ही मोहीम नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण, 2017 याचाच एक भाग आहे ज्यात प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, तसेच तंदुरुस्ती आणि निरोगी जीवन जगणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा उद्देश असलेल्या फिट इंडिया मोहीम 2019 चा एक भाग म्हणूनही  हा उपक्रम काम करेल.

 

S.Bedekar/V.Yadav/P.Malandkar


सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1898840) Visitor Counter : 248