रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

उत्तर प्रदेशमध्ये फ्लेक्स हायब्रीड वाहनांच्या बाजारपेठेसाठी प्रचंड क्षमता असल्याचे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Posted On: 11 FEB 2023 10:28PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लखनौ इथे यूपी जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 मध्ये ई-मोबिलिटी, वाहने आणि भविष्यातील गतिशीलता या विषयावरील सत्राला संबोधित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह, नीती आयोगाचे सीईओ परमेश्वरन अय्यर आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले भारतातील एकूण नोंदणीकृत विजेवरील वाहनांपैकी (ईव्ही) 25%  उत्तर प्रदेशमध्ये असून, इथे फ्लेक्स हायब्रीड वाहनांची बाजारपेठ निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. कानपूर, लखनौ, नोएडा, गाझियाबाद आणि मेरठ ही शहरे ई-वाहने आणि लिथियम बॅटरीजची प्रमुख उत्पादन केंद्रे बनत आहेत.

ते म्हणाले की सध्या राज्यात 740 इलेक्ट्रिक बसेस धावत असून, या संख्येत वाढ होऊन लवकरच ती 5000 वर पोहोचेल. मंत्री म्हणाले की, सरकार राज्यात दर 150 किमी वर वाहनांसाठी स्क्रॅपिंग सेंटर्स (भंगार) आणि व्हेईकल फिटनेस सेंटर्स (देखभाल केंद्रे) स्थापन करत आहे. ते म्हणाले की उत्तर प्रदेश इथेनॉलचा सर्वात मोठा उत्पादक असून, दुसर्‍या पिढीचा लो-कार्बन इथेनॉल विकसित करायला प्राधान्य देत आहे.

शेतकऱ्यांना अन्नदाता असण्याबरोबरच ऊर्जा दाता देखील बनवत असून  नवा भारत सुरक्षित, पुनर्वापर करण्याजोग्या आणि शाश्वत अशा स्वदेशी उत्पादनांना नेहमीच प्रोत्साहन देतो, आणि गतीशीलतेच्या क्षेत्रात हरित ऊर्जा आणि हरित अर्थव्यवस्थेसाठी जागा निर्माण करतो असे  गडकरी म्हणाले.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898412) Visitor Counter : 182