राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 12 ते 13 फेब्रुवारीदरम्यान उत्तर प्रदेश दौऱ्यावर
Posted On:
11 FEB 2023 6:54PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 12 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत.
राष्ट्रपती 12 फेब्रुवारी, 2023 रोजी लखनऊमध्ये उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार संमेलन-2023 च्या समारोप सत्रात सहभागी होतील. त्याच दिवशी संध्याकाळी, उत्तर प्रदेश सरकारतर्फे लखनऊमधील लोक भवन येथे आयोजित नागरी सत्कार समारंभाला उपस्थित राहतील.
राष्ट्रपती, 13 फेब्रुवारी 2023 रोजी लखनऊमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. दिल्लीला परतण्यापूर्वी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन वाराणसी येथे गंगा आरतीलाही त्या उपस्थित राहणार आहेत.
***
N.Chitale/V.Ghode/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1898345)
Visitor Counter : 218