पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
जागतिक जैव इंधन आघाडी: भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील एक प्राधान्यक्रम
Posted On:
11 FEB 2023 3:30PM by PIB Mumbai
ब्राझील, भारत आणि अमेरिका हे देश आघाडीवरील जैवइंधन उत्पादक आणि ग्राहक म्हणून, पुढील काही महिन्यांत अन्य इच्छुक देशांसह जागतिक जैवइंधन आघाडी विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील. परिवहन क्षेत्रासह, शाश्वत जैवइंधनाचा वापर वाढवणे आणि सहकार्य करणे हे या आघाडीचे उद्दिष्ट असेल. या माध्यमातून बाजारपेठ बळकट करणे, जागतिक जैवइंधन व्यापार सुलभ करणे, ठोस धोरण अभ्यास विकसित करणे आणि सामायिक करणे तसेच जगभरातील राष्ट्रीय जैवइंधन कार्यक्रमांसाठी तांत्रिक पाठबळ तरतूद यावर भर दिला जाईल. हे यापूर्वीच अंमलात आणलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि कामगिरी यावर देखील जोर देईल.
ही आघाडी संबंधित विद्यमान प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने त्यांना पूरक कार्य करेल. तसेच स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय जैव भविष्य मंच, नवोन्मेष अभियान जैवऊर्जा उपक्रम आणि जागतिक जैव ऊर्जा भागीदारी (जीबीइपी). यासह जैव ऊर्जा, जैव अर्थव्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण क्षेत्रातील पुढाकार अधिक व्यापक करेल.
जागतिक जैव इंधन आघाडी ही भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील प्राधान्यांपैकी एक आहे आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस पुरी यांनी भारत ऊर्जा सप्ताह 2023 दरम्यान याची घोषणा केली होती.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898299)
Visitor Counter : 438