दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
देशातील 5जी सेवा
Posted On:
08 FEB 2023 3:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
दूरसंचार सेवा पुरवठादारांनी (TSPs) 01.10.2022 पासून देशात 5जी सेवा सुरु केली आहे. 31.01.2023 पर्यंत, देशातील 238 शहरांमधील सर्व परवानाधारक सेवा क्षेत्रांमध्ये 5जी सेवा सुरु करण्यात आली आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये 5G सेवा उपलब्ध करून देण्याचे दायित्व म्हणून, सरकारने यासाठी एक पथदर्शक आराखडा तयार केला आहे. स्पेक्ट्रम आणि परवाना अटींच्या लिलावासाठीचे अर्ज मागवण्याकरता, दिनांक 15-06-2022 रोजी जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार (NIA), स्पेक्ट्रम वाटपाच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीत संबंधित सेवा सुरु करण्याचे (रोलआउट) दायित्व टप्प्याटप्प्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. दूरसंचार सेवा सुरु करण्याबाबत अनिवार्य दायित्वांच्या पलीकडे मोबाइल नेटवर्कचा पुढील विस्तार करायचा असेल, तर त्याबाबतच्या तांत्रिक-व्यावसायिक बाबींचा विचार करून दूरसंचार सेवा पुरवठादार (TSPs) योग्य तो निर्णय घेतील.
दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897309)
Visitor Counter : 209