सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती अभियानाअंतर्गत पश्चिम क्षेत्राला 304.65 कोटी रुपये कर्ज आणि 100.55 कोटी रुपये अनुदानाच्या रकमेपोटी वितरित
Posted On:
08 FEB 2023 10:17AM by PIB Mumbai
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक झेप घेत, खादी आणि ग्रामोद्योग अध्यक्ष मनोज कुमार यांनी, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती अभियानाअंतर्गत, पश्चिम विभागातील 1463 लाभार्थ्यांना (गोवा, महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दीव, दादरा-नगर हवेली) अनुदानापोटी दिली जाणारी मार्जिन रक्कम म्हणून 100.55 कोटी रुपये वितरित केले. PMEGP योजनेअंतर्गत, एकूण 304.65 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी, महाराष्ट्रातील 654 लाभार्थ्यांना 24.38 कोटी रुपये वितरित करण्यात आले. खादी आणि ग्रामोद्योग विभागातर्फे राबवली जाणारी ही केंद्र सरकारची रोजगाराभिमुख पथदर्शी योजना आहे.
यावेळी बोलतांना, खादी आणि ग्रामोद्योग अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यात, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना महत्वाची भूमिका पार पाडते आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयुक्तालय, विविध उपक्रमांच्या माध्यमातून, अगदी दुर्गम भागातील कारागिरांना त्यांच्या दारी अत्यंत कमी खर्चात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहे, असे त्यांनी सांगितले. एका समृद्ध, मजबूत, स्वयंपूर्ण आणि आनंदी देशाची उभारणी करण्यासाठी, सर्व लाभार्थ्यांनी आपापले विभाग यशस्वीपणे सांभाळावेत, यासाठी मनोज कुमार यांनी प्रोत्साहन दिले. यामुळे, देशातील बेरोजगार युवकांना आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्याची प्रेरणा मिळेल, असं ते म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान, केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी “ खादी संवाद” या कार्यक्रमाअंतर्गत, खादी आणि ग्रामोद्योग कारागीर आणि संस्थेचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत भोजनही केले.
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897210)
Visitor Counter : 181