अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विविध योजनांच्या माध्यमातून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय कार्यक्षम पुरवठा साखळीसह अन्न प्रक्रिया तसेच अन्न टिकवून ठेवण्यासाठीच्या पायाभूत सुविधा यांना बळकटी आणण्यात करत आहे मदत

Posted On: 07 FEB 2023 2:20PM by PIB Mumbai

 

विविध योजनांच्या माध्यमातून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय कार्यक्षम पुरवठा साखळीसह अन्न प्रक्रिया तसेच अन्न टिकवून ठेवण्यासाठीच्या पायाभूत सुविधा यांना बळकटी आणण्यात मदत करत आहे आणि त्यायोगे उत्पादन आणि प्रक्रिया क्षमता तसेच काढणीपश्चात नुकसान यांच्या दरम्यान असलेली दरी भरुन काढत आहे अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे दिली आहे. वर्ष 2016-17 पासून हे मंत्रालय पंतप्रधान किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय) ही केंद्र सरकारी क्षेत्रातील सर्वंकष योजना राबवीत असून या योजनेतील घटक योजनांच्या अंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांमुळे देशात सुमारे 194 लाख मेट्रिक टन इतकी साठवण आणि प्रक्रिया क्षमता निर्माण झाली आहे असे त्यांनी सांगितले.

 आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक, तंत्रज्ञानविषयक आणि व्यापारविषयक पाठबळ पुरविण्यासाठी वर्ष 2020-21 पासून केंद्र पुरस्कृत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण (पीएमएफएमई) ही योजना राबवीत आहे आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18472 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 10,900 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह 6 वर्षांमध्ये (2021-22 ते 2026-27 या काळात)अन्न प्रक्रिया क्षेत्रात दर्जेदार ब्रँड निर्माण करुन अन्न प्रक्रिया क्षमतेचा विस्तार करण्यासाठी सुविधा निर्माण करणे हा केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या केंद्र सरकारी क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगांसाठीची उत्पादनाशी संलग्न मदत अनुदान योजनेचा  (पीएलआयएसएफपीआय)उद्देश आहे. या योजनेच्या विविध प्रकारांच्या अंर्तगत एकूण 180 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी दिली.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896949) Visitor Counter : 201