युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

युथ 20 (वाय 20) 2023 गटाच्या पहिल्या बैठकीला गुवाहाटी इथे प्रारंभ

Posted On: 06 FEB 2023 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2023

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली 'युवा संवाद' कार्यक्रम होणार असून त्यानंतर श्वेतपत्रिका प्रकाशित होईल.

जी-20 परिषदेच्या निमित्ताने गुवाहाटी इथे आज पहिल्या युथ 20 (Y20 / वाय 20) 2023 गटाच्या  बैठकीला सुरुवात झाली. तरुणांपर्यंत पोहोचून उद्याच्या उत्तम भविष्यासाठीच्या त्यांच्या  कल्पना जाणून घेण्यासाठी युथ 20 मध्ये होणारे  विचारमंथन लाभदायी ठरेल अशी आशा, युवा व्यवहार मंत्रालयाच्या सचिव मीता राजीवलोचन  यांनी बैठकीपूर्वी माध्यमांना माहिती देताना व्यक्त केली.

या तीन दिवसीय वाय 20 बैठकीच्या पाच संकल्पनांविषयी मीता राजीवलोचन  यांनी माहिती दिली. कामाचे भविष्य: उद्योग 4.0, नवोन्मेष  आणि 21वे शतक; हवामान बदल आणि आपत्तीकाळातील धोक्यांत घट यादिशेने प्रयत्न करणे , शाश्वततेला जीवनाचा मार्ग बनवणे, शांतता आणि सामंजस्य प्रस्थापित करणे : युद्ध नसलेल्या युगात प्रवेश,  एकत्रित भविष्य : लोकशाही आणि प्रशासनातील  युवा वर्गाचा सहभाग; आरोग्य, कल्याण आणि क्रीडा: युवकांसाठी अजेंडा या पैलुंवर या बैठकीत भर दिला गेला आहे.

यातील प्रत्येक संकल्पना देशातील विविध  भागातील लोकांशी साधर्म्य सांगते आणि या  संकल्पनांविषयी प्रत्येक भागाचा स्वतःचा असा  दृष्टीकोन आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमातील चर्चा सर्वदूर पोहोचवण्यामागे हेच कारण आहे, असे त्या म्हणाल्या.

या बैठकीत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली 'युवा संवाद' कार्यक्रम होणार असून त्यानंतर विविध संकल्पनांवर श्वेतपत्रिका प्रकाशित होणार आहे, अशी माहिती मीता राजीवलोचन  यांनी दिली.

युथ 20 शिखर परिषदेच्या देशभरात होणाऱ्या एकूण 17 बैठकींपैकी ही पहिलीच बैठक असून ऑगस्ट 2023 मध्ये युथ 20 ची सांगता शिखर परिषद होईल.

ट्वीट :

 

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896753) Visitor Counter : 181