ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळाने बंगळुरू येथे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाअंतर्गत  पहिल्या 'ऊर्जा संक्रमण ' कार्यगटाच्या  बैठकीत ‘कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र केले आयोजित

Posted On: 05 FEB 2023 8:24PM by PIB Mumbai

 

एनटीपीसी लि. या भारतातील सर्वात मोठया एकात्मिक  वीज निर्मिती कंपनीनेबंगळुरू येथे भारताच्या  जी 20 अध्यक्षपदाअंतर्गत  पहिल्या 'ऊर्जा संक्रमण' कार्यगटाच्या  बैठकीत कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेजया विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.

केंद्रीय ऊर्जा मंत्री तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी देखील कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेजया विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झाले आणि एनटीपीसीने हाती घेतलेल्या उपक्रमांवर चर्चा केली.

या चर्चासत्रात, 200 हून अधिक मान्यवर, वक्ते, पॅनेलचे सदस्य आणि विविध देशांचे प्रतिनिधी  सहभागी झाले होतेत्यांनी सीसीयुएस (CCUS) संबंधित त्यांच्या ज्ञानाचे आणि विचारांचे आदान-प्रदान केले.

"कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज (CCUS)- टेक्नॉलॉजी गॅप्स अँड इंटरनॅशनल कोलॅबोरेशन" या विषयावरील अभ्यास अहवाल, भारताच्या अध्यक्षपदाखालील जी 20 शिखर परिषदेत तयार करण्यात आला होता, या कार्यक्रमादरम्यान त्याचे प्रकाशन करण्यात आले.

याव्यतिरिक्तफ्लू गॅस CO2 चा वापर करून मिथेनॉल सिंथेसिस करण्याच्या एनटीपीसी प्रकल्पाचे 3D-मॉडेल देखील या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. जीवाश्म-आधारित वीज  प्रकल्पातून होणारे कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे उत्सर्जन कमी करून  त्याचे उपयुक्त हायड्रोकार्बनमध्ये, म्हणजेच मिथेनॉलमध्ये रूपांतर करणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.

***

S.Kane/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896486) Visitor Counter : 241