रेल्वे मंत्रालय

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेअंतर्गत भारतीय रेल्वे गौरव डीलक्स वातानुकुलित पर्यटन रेल्वे सुरू करणार


“गर्वी गुजरात” प्रवास 28 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सफदरजंग स्थानकावरून सुरू होणार

Posted On: 05 FEB 2023 9:48AM by PIB Mumbai
  • चमकत्या गुजरातचा वारसा प्रदर्शनीय स्वरूपात मांडण्यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत योजनेच्या धर्तीवर या रेल्वे गाडीचं आरेखन करण्यात आलं आहे
  • उत्कृष्ट प्रतीची भारत गौरव डीलक्स वातानुकुलित पर्यटन ट्रेनमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी असून संपूर्ण प्रवास आठ दिवस चालणार आहे
  • या पर्यटन रेल्वे गाडीत प्रथम श्रेणीचे चार डबे, द्वितीय श्रेणीचे दोन डबे एक संपूर्णपणे सुसज्ज पॅन्ट्री डबा आणि दोन उपहारगृह असणार आहेत. यात 156 प्रवासी सामावले जाऊ शकतात.
  • महत्त्वाची पर्यटन स्थळ आणि गुजरातच्या वारसा स्थळांचा समावेश यात असणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, चंपानेर, सोमनाथ, द्वारका, नागेश्वर, बैत द्वारका, अहमदाबाद, मोठेरा आणि पटण ही प्रवासादरम्यानची मुख्य आकर्षण असतील. 
  • प्रवासी गुरुग्राम, रेवरी, रिंगासं, फुल्लेरा आणि अजमेर रेल्वे स्थानकावर या पर्यटन रेल्वे गाडीत चढू व उतरू शकतात
  • आयआरसीटीसी ने ग्राहकांसाठी सुलभ मासिक हत्यांद्वारे प्रदान करण्याच्या हेतूने सुलभ देय रचना (Payment gateway) उपलब्ध केली आहे.

भारतीय रेल्वेने गर्वी गुजरात ही विशेष यात्रा चमकत्या गुजरातचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा भारत गौरव वातानुकुलित रेल्वे गाडीच्या माध्यमातून प्रदर्शनीय स्वरूपात समोर आणण्याचा उपक्रम आखला आहे. आयआरसीटीसी चालवणार असलेली ही विशेष पर्यटन रेल्वे गाडी 28 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकांवरून आठ दिवसाच्या प्रवासाला निघणार आहे. गुरुग्राम, रेवरी, रिंगासं, फुल्लेरा आणि अजमेर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेत चढण्याची  आणि उतरण्याची सुविधा उपलब्ध आहे 

थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावरील संकल्पनेतून साकारलेल्या भारत सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत’ योजने अंतर्गत या रेल्वे गाडीची संरचना केली आहे. या संपूर्ण प्रवासात रेल्वेगाडीचा पहिला थांबा केवडिया इथं दिला असून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे याठिकाणी  मुख्य आकर्षण ठरणार आहे.  ही संपूर्ण रेल्वे गाडी आठ दिवसांच्या आपल्या प्रवासात साडेतीन हजार किलोमीटर प्रवासाचा टप्पा गाठणार आहे.

 जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी, युनेस्कोने जागतिक वारसा प्रदान केलेले चंपानेर पुरातत्व उद्यान, अधलज इथली पायऱ्या असलेली विहीर, अहमदाबादचं अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम, मोढेरासूर्य मंदिर आणि पटण हे युनेस्कोची वारसा दर्जा लाभलेली रानी की वाओ हे या प्रवासादरम्यान इतर मुख्य आकर्षण आहेत. याशिवाय सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर आणि बैत द्वारका या धार्मिक स्थळांनाही या प्रवासात भेट दिली जाणार आहे.  या प्रवासात दोन दिवस अनुक्रमे केवडिया आणि अहमदाबाद इथल्या हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे तर सोमनाथ आणि द्वारका इथे दिवसाच्या मुक्कामा दरम्यान भेट दिली जाणार आहे.

उत्कृष्ट प्रतीच्या या वातानुकूलित प्रवासी रेल्वे गाडीमध्ये दोन उत्कृष्ट प्रतीची उपहारगृह, एक आधुनिक स्वयंपाकघर, रेल्वे डब्यांमध्ये शॉवर क्युबिकल्स, सेन्सर असलेली न्हाणीघर, फूट मसाजर यांसारखी काही विस्मयकारक वैशिष्ट्य पुरवण्यात आली आहेत. या संपूर्ण वातानुकुलित असलेली रेल्वे गाडीत दोन प्रकारच्या निवासी सोयी उपलब्ध असतील. प्रथम श्रेणी वातानुकुलन आणि द्वितीय श्रेणी वातानुकूलन, या रेल्वे गाडीत अत्याधुनिक पद्धतीची सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक डब्यात सुरक्षा रक्षक उपलब्ध असतील.  संपूर्ण रेल्वेगाडी माहिती आणि मनोरंजन प्रणालीने युक्त असेल. 

भारत सरकारच्या देखो अपना देश” या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने भारत  गौरव प्रवासी गाडीची सुरुवात झाली आहे. या प्रवासाची द्वितीय श्रेणी वातानुकुलित डब्याच्या आसनांचा दर  प्रत्येकी रू.52250/-, प्रथम श्रेणी वातानुकुलित डब्याच्या आसनांचा दर (केबिन) प्रत्येकी रुपये 67140/-, तर प्रथम वातानुकुलित डब्याच्या आसनांचा दर (कूप) प्रत्येकी रुपये 77400/- या दरात उपलब्ध असतील. आयआरसीटीसी पर्यटन  रेल्वे गाडीचा संपूर्ण  प्रवास 8 दिवसांचा राहणार आहे. या समाविष्ट दरात वातानुकुलित हॉटेलमध्ये रात्रीचं वास्तव्य, बसमधून लगतच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी,  संपूर्ण कालावधीत जेवण (फक्त शाकाहारी), प्रवासी विमा, मार्गदर्शक अर्थात गाईड ची सेवा याचा समावेश असेल. आयआरसीटीसी कडून या प्रवासा दरम्यान आरोग्याबाबत सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे. तसेच पाहुण्यांना सुरक्षित आणि संस्मरणीय सेवा मिळेल, याबाबत आयआरसीटीसी प्रयत्न करणार आहे.

हा प्रवास जास्तीत जास्त लोकांपर्यंत अत्यंत आकर्षक आणि माफक दरात पोहोचविण्याच्या उद्देशाने आयआरसीटीसी ने देय प्रदान रचना (Payment gateway) तसंच मासिक हप्यांच्या माध्यमातून प्रवासाचा खर्च विभाजित होईल, अशी  सोय केली आहे. याबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आय आर सी टी सी चं संकेतस्थळ: https://www.irctctourism.com  याला भेट द्या. आरक्षण प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर आय आर सी टी सी च्या वेब पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध असणार आहे.

 

 ****

Hansraj R/Sandesh N/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896434) Visitor Counter : 237