राष्ट्रपती कार्यालय

संत गुरु रविदास यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

Posted On: 04 FEB 2023 9:05PM by PIB Mumbai

 

संत गुरु रविदास यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, गुरु रविदासजींच्या जयंतीच्या या शुभ प्रसंगी सर्व देशवासीयांना माझ्या सदिच्छा आणि हार्दिक शुभेच्छा.

संत गुरु रविदास हे महान समाजसुधारक आणि शांती, प्रेम आणि बंधुत्वाचे दूत होते. जातपात आणि धर्मावर आधारित भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. उपेक्षितांच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अनेक रचनाही लिहिल्या.

त्यांचे जीवन त्याग आणि तपश्चर्येचे अद्वितीय उदाहरण आहे. त्यांनी मानवतेची सेवा ही ईश्वरसेवा मानली.

आपण त्यांच्या शिकवणीचे पालन करूया आणि सर्वांगीण जनहिताच्या उद्देशाने पुढे जाऊया.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1896382) Visitor Counter : 155