ऊर्जा मंत्रालय
'कार्बन कॅप्चर युटिलायझेशन आणि स्टोरेज' या विषयावर राष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, G20 आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे करणार आयोजन
Posted On:
04 FEB 2023 1:44PM by PIB Mumbai
1. या चर्चासत्रात "स्वच्छ ऊर्जा संक्रमण" साध्य करण्यासाठी आणि त्यानंतर नेट शून्य उत्सर्जनाकडे वाटचाल करण्यासाठी 'कार्बन कॅप्चर
युटिलायझेशन आणि स्टोरेज' (CCUS) याचे महत्त्व अधोरेखित करण्यावर भर देण्यात येईल.
2. या चर्चासत्रात विविध देशांचे उद्योग, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
भारताने 1 डिसेंबर 2022 पासून एका वर्षाच्या कालावधीसाठी जी20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे.या अध्यक्षतेखाली, ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाची (एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुप, ETWG) पहिली बैठक 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणार आहे.
भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या वतीने, भारतातील सर्वात मोठा एकात्मिक ऊर्जाग्राहक राष्ट्रीय अणुऊर्जा आयोग,(एनटीपीसी,) 5 फेब्रुवारी 2023 रोजी बेंगळुरू येथील ताज वेस्टेंड येथे कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज (CCUS) या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या मुख्य मंडपाच्या बाजूला हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या चर्चासत्रात विविध देशांचे उद्योग, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
ही परीषद "स्वच्छ ऊर्जा संक्रमण" साध्य करण्यासाठी आणि त्यानंतर व्यावहारिक शून्य उत्सर्जनाकडे (नेट झिरो) वाटचाल करण्यासाठी सीसीयूएसचे (CCUS) महत्त्व अधोरेखित करण्यावर भर देईल.
***
M.Jaybhaye/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896270)
Visitor Counter : 257