भारतीय निवडणूक आयोग

आगामी निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या 'मैं भारत हूं' या गाण्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.


या गीताची  हिंदी आणि बहुभाषिक आवृत्ती, लॉन्च झाल्यापासून एका आठवड्यात, 3.5 लाख व्ह्यूज आणि 5.6 लाख इंप्रेशन मिळाले.

मतदान करणे हे आपले  राष्ट्रीय कर्तव्य मानणाऱ्या प्रत्येक मतदाराला हे गीत समर्पित आहे : मुख्य निवडणूक आयुक्त

Posted On: 03 FEB 2023 11:17PM by PIB Mumbai

 

देशात यावर्षी होणाऱ्या 9 विधानसभा आणि पुढील वर्षीच्या प्रारंभी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढवण्याच्या उद्देशाने अभिनव संपर्क धोरणे राबवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग सज्ज आहे. अशाच प्रकारच्या एका उपक्रमा अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाने सुभाष घई प्रतिष्ठानच्या सहयोगाने - 'मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता हैं' या गीताची निर्मिती केली आहे. या गीताद्वारे  जीवनातील विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती मतदारांना मतदान करण्याचे आणि आपले  संवैधानिक कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करत आहेत.

यावर्षी तेराव्या राष्ट्रीय मतदार दिनी 25 जानेवारी 2023 रोजी भारताच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आलेले हे गाणे सुप्रसिद्ध  आणि प्रभावशाली व्यक्तींमुळे समाज माध्यमांवर आधीच लोकप्रिय होऊ लागले आहे. हे गीत लॉन्च झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या चार शक्तिशाली समाज माध्यमांवर या गीताच्या हिंदी आणि बहुभाषिक आवृत्तीला एका आठवड्यात, 3.5 लाख व्ह्यूज आणि 5.6 लाख इंप्रेशन मिळाले आहेत.

हे गाणे भारतीय निवडणूक आयोगाच्या 'सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ (SVEEP) ‘मतदारांचे पद्धतशीर  शिक्षण आणि निवडणूक सहभागया  कार्यक्रमाच्या अशाच उपक्रमांपैकी एक आहे. एकही मतदार मागे राहता कामा नयेया भारतीय निवडणूक आयोगाच्या बोधवाक्यानुसार प्रत्येक श्रेणीतील मतदारांना सहभागी करून घेण्यावर हा महत्वाकांक्षी मतदार शिक्षण कार्यक्रम भर देतो. लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी मतदारांना त्यांचे अधिकार आणि जबाबदारी याबद्दल शिक्षण देण्यासोबतच हा उपक्रम त्यांना  निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे.

सुभाष घई यांच्या नेतृत्वाखालील टीमने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारआणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि निवडणूक आयुक्त अरुण गोयल, यांच्या उपस्थितीत निवडणूक आयोगासोबत अनेकवेळा  संवाद साधल्यानंतर गाण्याला अंतिम रुप देण्यात आले.

हे गाणे अशा प्रत्येक मतदाराला समर्पित आहे, ज्याला त्याच्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तो मतदान करतो, असे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले.

हे गाणे नवीन मतदारांना प्रेरित करते, भावी मतदारांना आणि तरुण मतदारांना उत्साहित करते, शताब्दी मतदारांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करते, सेवा मतदार, दिव्यांग मतदार, लोकशाहीवर विश्वास दाखवणाऱ्या सर्व  महिला ज्यांनी 2019 च्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करून  पुरुष मतदारांना मागे टाकले आहे आणि भारतीय निवडणूक आयोगासह स्वतःसाठी एक नवीन ध्येय ठेवले आहेअशा महिला  मतदारांचा उत्साह या गीताच्या माध्यमातून  साजरा केला जात आहे.

भारताची विविधता आणि लोकसंख्या साजरी करत असताना, हे गाणे ‘‘मतदानासारखे दुसरे काही नाही, मी नक्की मतदान करणार’  या  राष्ट्रीय मतदार दिवस 2023 च्या संकल्पनेत  योगदान देण्याचा प्रयत्न करते.

गाण्याची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत:

व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल स्कूल ऑफ म्युझिक, मुंबई यांच्या सहकार्याने  या गाण्याचे प्रेरणादायी आणि प्रेरक बोल प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी लिहिले आहेत आणि संगीतबद्ध केले आहेत.

हे गाणे हिंदी आणि जास्तीत जास्त भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या, बंगाली, मराठी, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, आसामी, ओडिया, काश्मिरी, संथाळी या  12 प्रादेशिक भाषांमध्ये गायले आहे.

मै भारत हूंया गाण्याचा कोरस सर्व आवृत्त्यांमध्ये एकसारखा आहे.

हिंदी आवृत्तीतील गाण्यासाठी  ख्यातनाम गायक सुखविंदर सिंह , कविता कृष्णमूर्ती, सोनू निगम, हरीहरन, अलका याज्ञिक, जावेद अली, केएस चित्रा, कौशिकी चक्रवर्ती, उस्ताद रशीद खान यांनी आपला आवाज दिला आहे.

कौशिकी चक्रवर्ती, वैशाली सामंत, भूमी त्रिवेदी, मिका सिंग, के.एस. चित्रा, मनो, विजय प्रकाश, विजय येसुदास, पॅपॉन , दिप्ती रेखा पाधी, मेहमीत सय्यद, पंकज जल या प्रसिद्ध गायकांनी   प्रादेशिक आवृत्तीतील गाणे गायले आहे.

हे गाणे  हिंदी आवृत्ती, बहुभाषिक आवृत्ती, वाद्य आवृत्ती, पियानो आवृत्ती, आंतरराष्ट्रीय साउंडट्रॅक आणि रिंगटोन आवृत्ती या विविध आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

गाण्यात महिला मतदार, तरुण मतदार, शंभर वर्षांचे  मतदार, दिव्यांग  मतदार यांचा समावेश असलेल्या विविध मतदार समूहांचे  चित्रण करण्यात आले आहे जे सर्वसमावेशक आणि सुलभ निवडणुक प्रक्रिया अधोरेखित करते.

देशाची प्रादेशिक विविधता, सांस्कृतिक, सामाजिक-आर्थिक आणि भौगोलिक पैलू लक्षात घेऊन  या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. आणि  म्हणूनच हे गाणे मतदारांच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करते.

या गाण्याच्या चित्रफितीमध्ये  भारतीय निवडणूक आयोगाचे आयकॉन पंकज त्रिपाठी यांच्यासह अनिल कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, आर.के. माधवन, सुबोध भावे, प्रसेनजीत चॅटर्जी, मोहनलाल, कपिल बोरा, सूर्या, गिप्पी ग्रेवाल, शुभमन गिल, हर्षल पटेल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर या प्रसिद्ध व्यक्तींनीही 'एका' मताच्या महत्त्वावर' भर देताना दिसत आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक सुभाष घई, सोनू निगम, उस्ताद रशीद खान, के.एस. चित्रा, दीप्ती रेखा पाधी, वैशाली सामंत, मेहमीत सय्यद, पॅपॉन, अभिषेक बोंथू आणि भारतीय निवडणूक आयोगाचे आयकॉन पंकज त्रिपाठी   यांसारख्या गायकांनी नवी दिल्लीत आयोजित  13 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या समारंभात  सहभाग घेतला.

प्रत्येक भारतीय भारतावर प्रेम करतो या भावनेतून या गाण्याचे बोल प्रेरित आहेत. त्यांचा आत्मा, हृदय, मन आणि शरीर भारताविषयी अभिमानाने सांगतात की, भारत ही  जगातील सर्वात बळकट  लोकशाही हे असून त्याची  मुळे  खोल प्राचीन आहेत आणि हे उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीशील आणि आधुनिक आहे.प्रत्येक भारतीयाला 'मी भारत आहे ' (मैं भारत हूं) असे म्हणण्याचा अभिमान वाटतो, कारण त्यांना  आपल्या देशाचा कारभार चालवण्यासाठी आणि हा देश घडवण्यासाठी सर्वोत्तम कार्यकारी निवडण्यात एका व्यक्तीच्या मताची ताकद माहीत आहे.  स्थिती, वर्ग, धर्म, जात, स्थान, भाषा आणि लिंग ओळख विचारात न घेता ज्यांना  आपल्या कर्तव्यासह आपल्या देशासाठी मतदान करण्याचा अधिकार समजतो त्या प्रत्येक मतदाराला आधुनिक भारतातील सर्वोत्कृष्ट शिल्पकार  बनण्याची आकांक्षा बाळगण्यासाठी हे गाणे तयार करण्यात आले आहे. म्हणूनच, गाणे म्हणताना ते अभिमान बाळगतात ज्याप्रमाणे या गाण्यात म्हटले आहे  - "मैं भारत हूं- भारत है मुझमे - हम भारत के मतदाता हैं- मतदान देने जायेंगे भारत के लिए..."

 

***

S.Patil/B.Sontakke/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896196) Visitor Counter : 536